Schools, Anganwadis, and colleges shut in Palghar due to heavy rain red alert issued for tomorrow 
महाराष्ट्र

School Closed: पालघरमधील अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी; पावसाचा अलर्ट

School Closed : हवामान विभागाने 'येलो अलर्ट' जारी केल्यानंतर पालघर जिल्हा प्रशासनाने सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सततच्या पावसामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Bharat Jadhav

  • पालघर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

  • मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी जाहीर करण्यात आली.

  • जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.

राज्यात गेल्या दोन ते दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. आज मुंबईसह अनेक शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आता हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. याच कारणामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

पालघरमध्ये उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. उद्यादेखील जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना सु्ट्टी देण्याचा निर्णय घेतलाय. प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून, संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत व संदर्भ क. 2 कडील शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT