palghar  Saam tv
महाराष्ट्र

नामांकित कंपनीच्या संचालकाने आयुष्य संपवलं, औद्योगिक क्षेत्रात खळबळ

palghar shocking news : पालघरमधील नामांकित कंपनीच्या संचालकाने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कार्यकारी संचालकाने टोकाचं पाऊल उचलल्याने औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

रुपेश पाटील

कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरची आत्महत्या

एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरच्या आत्महत्येने औद्योगिक क्षेत्रात खळबळ

पतीच्या आत्महत्येनंतर पोलिसांत तक्रार देत पत्नीचा गंभीर आरोप

पुण्याच्या पिंपरी चिंचवड शहरातील एका कंपनीतील आयटी अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना पालघरमधूनही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पालघरमध्येही बोईसरमध्ये राहणारे आणि औद्योगिक क्षेत्रात वरिष्ठ पदावर कार्यरत असणारे ५७ वर्षीय एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रदीप जाधव यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रदीप जाधव यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या पत्नी वंदना यांनी गंभीर आरोप करत पोलिसांत धाव घेतली. कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक छळामुळे पतीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप केलाय.

तक्रारीनुसार, प्रदीप जाधव हे पालघरच्या बोईसरमध्ये असलेल्या एमआयडीसीतील विराज प्रोफाइल कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल डायरेक्टर पदावर कार्यरत होते. कंपनीचे सीईओ जे. पी. गर्ग यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे. त्यांचा मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी अनेक वेळा कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती.

या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून काही महिन्यांपूर्वी त्यांनी कंपनीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी दुसर्‍या कंपनीत नोकरी स्वीकारली होती. परंतु विराज प्रोफाइलच्या व्यवस्थापनाने त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधला. तसेच कंपनीत परत येण्याची विनंती केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

१९ जून रोजी सायंकाळच्या सुमारास कुटुंबीयांना प्रदीप जाधव यांच्याबाबत चिंताजनक माहिती मिळाली. त्यानंतर ते तातडीने बोईसर येथील निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी त्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच बोईसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला.

यावेळी घटनास्थळावरून सापडलेल्या डायरी आणि कथित आत्महत्येपूर्वी केलेल्या नोटमध्ये कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक छळाचा उल्लेख असल्याचा दावा पत्नी वंदना जाधव यांनी केलाय. या गंभीर आरोपांमुळे औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बोईसर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT