Shrinivas Vanga Wife  Saam Tv
महाराष्ट्र

Shrinivas Vanga: श्रीनिवास वनगांनंतर त्यांचे कुटुंबीय घर सोडून गेले, घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त

Maharashtra Assembly Election 2024: श्रीनिवास वनगा यांचे कुटुंबीय तलासरीतील कवाडा येथील घराला कुलून लावून घर बंद करून घरातून बाहेर गेले आहेत.

Priya More

रुपेश पाटील, पालघर

पालघर विधानसभेसाठी शिंदे गटाकडून तिकीट नाकारल्याने नैराश्यात असलेले श्रीनिवास वनगा ३६ तास अज्ञातवासात होते. मात्र ३६ तासानंतर बुधवारी मध्यरात्री आपल्या कुटुंबीयांना भेट देऊन ते पुन्हा विश्रांतीसाठी मित्रांसोबत आपल्या नातेवाईकांकडे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर गेले. श्रीनिवास वनगा घराबाहेर गेल्यानंतर आता त्यांचे कुटुंबीय देखील घरातून बाहेर गेले आहेत.

बुधवारी दुपारपासून श्रीनिवास वनगा यांचे कुटुंबीय तलासरीतील कवाडा येथील घराला कुलून लावून घर बंद करून घरातून बाहेर गेले आहेत. वनगा यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वनगा कुटुंबीय नेमके गेले कुठे याची सध्या तरी माहिती मिळाली नसली तरी ते नेमके गेले कुठे? असा प्रश्न मात्र नक्कीच उपस्थित होत आहे.

विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट न मिळाल्यामुळे श्रीनिवास वनगा यांचे नाराजी नाट्य सुरू आहे. श्रीनिवास वनगा हे नैराश्येत गेले. श्रीनिवास वनगा नॉटरिचेबल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क देखील साधला होता. पण त्यांचे श्रीनिवास वनगा यांच्यासोबत काही बोलणे झाले की नाही याबद्दल काहीच माहिती समोर आली नाही. श्रीनिवास वनगा यांची पक्षाकडून नाराजी दूर केली जाईल की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान 'आश्वासन देऊनही एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळला नाही तर उद्धव ठाकरे हे आपल्यासाठी देव असून मी त्या देव माणसाला फसवले.' असे वक्तव्य श्रीनिवास वनगा यांनी केले होते. तिकीट नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा घरात कोणालाही कल्पना न देता घरातून बाहेर पडले. गेल्या ३६ तासांपासून श्रीनिवास वनगा यांचे दोन्ही फोन बंद होते त्यामुळे कुटुंबीय चांगलेच चिंतेत आले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांची देखील चिंता वाढली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FIR Against Arvind Sawant: 'माल' विधान भोवलं, शायना एनसी यांच्या तक्रारीवरून अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Delhi double killing case : काका-पुतण्याला गोळ्या झाडून संपवल्याने खळबळ; दुहेरी हत्याकांडाचं धक्कादायक कारण आलं समोर

PM Modi Rally in Maharashtra : नरेंद्र मोदींचं 'मिशन महाराष्ट्र'; प्रचाराचा धडाका, कधी आणि कुठे होणार सभा?

Raj Thackeray: म्हणून मला मंत्रिपद मिळालं, राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेवर रामदास आठवले यांनी दिलं प्रत्युतर

Maharashtra Politics : बारामतीत पवार कुटुंबीयांचे यंदा दोन पाडवे का? अजितदादांनी सांगितलं कारण,VIDEO

SCROLL FOR NEXT