Akkalkuwa Vidhan Sabha : अक्कलकुवा मतदारसंघात चौरंगी लढत; मविआ, महायुतीच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवारांचे आव्हान

Nandurbar news : अक्कलकुवा मतदारसंघांत पाडवी विरुद्ध पाडवी अशी लढत पुन्हा एकदा पाहण्यास मिळणार आहे.
Akkalkuwa Vidhan Sabha
Akkalkuwa Vidhan SabhaSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: राज्यातील प्रथम मतदारसंघ असलेल्या अक्कलकुवा- अक्राणी विधानसभेसाठी चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात प्रमुख लढत ही महाविकास आघाडीचे के. सी. पाडवी व महायुतीचे उमेदवार विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्यात असेल. मात्र बंडखोरी करत अपक्ष उमेदवार असलेल्या भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांचे देखील दोघांना आव्हान राहणार आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा- अक्राणी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे ॲड. के. सी. पाडवी आठव्यांदा उमेदवारी करत आहेत. तर महायुतीतर्फे विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे या दोघा उमेदवारांमध्ये समोरासमोर लढत होणार असल्याचे चित्र असतानाच भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. हिना गावित यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत आव्हान दिले आहे. तर माजी मंत्री पद्माकर वळवी यांनीही भारतीय आदिवासी पार्टीतर्फे उमेदवारी दाखल केली. यामुळे यांच्यात लढत राहणार आहे. 

Akkalkuwa Vidhan Sabha
Vanchit Bahujan Aghadi : वंचितच्या दोन उमेदवारांना एबी फॉर्म; हिंगोलीत विचित्र प्रकाराने पेच

पाडवींची कडवी टक्कर 

अक्कलकुवा मतदारसंघांत पाडवी विरुद्ध पाडवी अशी लढत पुन्हा एकदा पाहण्यास मिळणार आहे. मागच्या पंचवार्षिक अर्थात २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमश्या पाडवी यांनी काँग्रेसच्या के. सी. पाडवी यांना कडवी टक्कर दिली होती. मात्र यात काँग्रेसने आपला बालेकिल्ला कायम राखला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत के. सी. पाडवी याना ८२ हजार ७७० मते मिळवत विजय प्राप्त केला होता. तर आमश्या पाडवी यांना ८० हजार ६७४ मते मिळाली होती. यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील दोन्ही पाडवींची कडवी टक्कर होणार असली तरी हिना गावित यांचे देखील आव्हान असेल.  

Akkalkuwa Vidhan Sabha
Jalgaon News : वडील घराला कडी लावून निघाले अन्‌ घात झाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून मुलीचा मृत्यू

माघारीनंतर होणार चित्र स्पष्ट 

दरम्यान आज अर्ज छानणी झाली असता हेमलता पाडवी यांनी काँग्रेसकडून दाखल केलेले दोन्ही अर्ज बाद झाले आहेत. तर शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष किरसिंग वसावे यांचा शिवसेना व अपक्ष असे दोन्ही अर्ज बाद व शंकर पाडवी यांचाही पक्षाचा अर्ज बाद झाला. डॉ. हिना गावित व डॉ. सुप्रिया गावित यांचे भाजप उमेदवारीचा अर्ज बाद झाला. तसेच अजित पवार राष्ट्रवादीचे रतन पाडवी यांनी पक्षातर्फे उमेदवारी केली होती. मात्र एबी फॉर्म नसल्याने त्यांच्याही अर्ज बाद झाला. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजयसिंग पराडके यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला. यासोबतच विजय सिंग फाळके यांचे बंधू आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते गणेश पराडके यांनी के. सी. पाडवी यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता हे सर्व पुढे काय भूमिका घेतात? यावर पुढील गणित अवलंबून आहे. त्यांनी माघारी घेतल्यास या मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com