Nikhil Shende Saam TV
महाराष्ट्र

Pakistan Honeytrap : आणखी एक प्रदीप कुरुलकर? हवाई दलातील कर्मचाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न

Pakistan Honeytrap : निखिल शेंडे असं या हवाई दल कर्मचाऱ्याचं नाव आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर  (Pradeep Kurulkar)  एटीएसने अटक केली आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या प्रदीप कुरुलकर यांनी गोपनिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याची बाब समोर आली होती. आता कुरुलकर यांच्यानंतर आता हवाई दलातील एका कर्मचाऱ्यालाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे.

निखिल शेंडे असं या हवाई दल कर्मचाऱ्याचं नाव आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. नागपूरच्या शांतीनगर परिसरात राहणारा निखिल शेंडे नॅशनल लेव्हलचा धावपटू आहे. (Latest Marathi News)

निखिलने २०११ व १२ मध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेत नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते. २०११ मध्ये त्याने नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेत एम. के. उमाठे व मोखारे महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करताना चौथा क्रमांक पटकावला होता.

तर २०१२ मध्ये बुटीबोरी येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करताना अव्वल स्थान मिळवले होते. २०१५ मध्ये तो एअरफोर्समध्ये ‘स्पोर्ट्स कोटा‘ अंतर्गत रुजू झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stroke: चेहरा तिरकस होणं, तोल जाणं...; स्ट्रोकची लक्षणं तुम्हाला माहितीये का? तज्ज्ञांनी दिली संपूर्ण माहिती

Buldhana News : पोलिसांकडून ४ लाखाची रक्कम जप्त; आडत्यांकडून खरेदी विक्री बंद, शेतकऱ्यांचा महामार्गावर चक्का जाम

Maharashtra News Live Updates : सोन्याचे भाव जसे वाढतात, तसे भविष्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार - छगन भुजबळ

IPL 2025 Auction: केएल राहुल ते रिषभ पंत.. या खेळाडूंना लय डिमांड; बेस प्राईज 2 कोटी, पाहा संपूर्ण यादी

Dark Circle: डोळ्यांखालील डार्क सर्कल घालवायचे तर 'या' घरगुती टिप्स फॅालो करा

SCROLL FOR NEXT