Paithan crime news 13th day of husband death brother forced physical relations with the woman in Dawarwadi  Saam TV
महाराष्ट्र

Paithan Crime News: पैठण हादरलं! नवऱ्याचं अपघाती निधन; तेराव्याच्या दिवशीच दिराचं वहिनीसोबत भयानक कृत्य

Paithan Dawarwadi News: पैठण तालुक्यातल्या दावरवाडी गावात ही संतापजनक घटना घडली.

साम टिव्ही ब्युरो

Paithan Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली. पोलिसांकडून अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळणे सुरू आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका दीराने आपल्याच वहिनीवर बलात्कार केला आहे. (Latest Marathi News)

जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या दावरवाडी गावात ही संतापजनक घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिलेच्या पतीचं अपघाती निधन झाल्यानंतर तेराव्याच्याच दिवशीच हा संतापजनक प्रकार घडला आहे. (Breaking Marathi News)

याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी Police) आरोपी चुलत दीरावर गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील दावरवाडी गावातील एका महिलेच्या पतीचे अपघाती निधन झाले.

महिलेच्या पतीच्या निधनानंतर त्याच्या तेराव्याचा कार्यक्रम आवरला होता. त्यानंतर आरामासाठी मृत व्यक्तीची पत्नी आपल्या चुलत सासूच्या घरी आरामासाठी थांबली होती. त्यावेळी महिलेच्या चुलत दीराने घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार (Crime News) केला.

दरम्यान, महिलेनं नकार देऊनही बळजबरीने चुलत दीराने बलात्कार केल्याने सदर महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरु असल्याचं सांगितलं आहे. पण, पतीच्या निधनानंतर अवघ्या तेराव्याच्या दिवशीच पत्नीवर हा प्रसंग ओढावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

Hair Care : घरच्या घरी बनवा हे हेअर जेल, राठ केस होतील मऊ आणि चमकदार

Zp School : शाळेत सुविधांची वानवा; विद्यार्थिनीचे सरपंच- ग्रामसेवकाला पत्र, व्यथा मांडत सुधारण्याची मागणी

Pivali Sadi Song: संसाराच्या गाड्यातून वैयक्तिक आयुष्याला सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी; 'पिवळी साडी' गाण्याची प्रेक्षकांमध्ये क्रेझ

Gateway Of India: गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आणि खास 10 मनोरंजक तथ्ये

SCROLL FOR NEXT