महाराष्ट्रात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी 107 पाकिस्तानी बेपत्ता असल्याची बाब उघड झालीय. या नागरिकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गर्भित इशारा दिलाय. 107 लोकं जे कुठे लपले असतील त्यांना पोलीस शोधतील आणि तिथेच ठोकतील, अशा शब्दात महाराष्ट्रात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना, उपमुख्यमंत्र्यांनी शिंदेंनी इशारा दिलाय.
देशातील राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी त्वरीत भारत सोडावा, असा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आलाय. त्यानंतर देशातील विविध राज्यातील पाकिस्तानी लोकांची यादी समोर येत आहे. महाराष्ट्रात देखील ज्यांची नोंद झाली त्यांनी देश सोडावा, असे फर्मान सरकारने काढलेत. महाराष्ट्रात देखील पाकिस्तानी लोक राहत आहेत. त्यापैकी १०७ जणांचा पत्ता पोलीस आणि अन्य संस्थांना लागत नाहीये. त्या बेपत्ता नागिरकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इशारा दिलाय. पाकिस्तानला दयामाया दाखवण्याचा कारण नाहीये.
जे आश्रय देतील त्यांनाही सोडले जाणार नाही. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ देश सोडून निघून जावं, असं शिंदे म्हणालेत. काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ला दुर्दैवी होता. त्यामुळे त्या ठिकाणी जाणं माझं कर्तव्य होतं. मात्र त्यातही विरोधक राजकारण करतात, असं शिंदेंनी यांनी पहलगाला जाण्यावरून स्पष्टीकरण दिलं.
राज्यात पाकिस्तानी नागरिक असण्यावरून देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला गेला. त्यावरून उत्तर देताना फडणवीस म्हणाले, गृहमंत्री म्हणून सांगतोय, यावर काहीही बातम्या करू नका. एकही पाकिस्तानी नागरिक हरवला नाहीये, जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडलेत. सर्व बाहेर चाललेत. सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली आहे. राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही. दरम्यान राज्यातील ४८ शहरात एकूण ५०२३ पाकिस्तानी नागरिक आढळलेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एका वृत्तवाहिनीला देताना दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.