संजय जाधव, बुलडाणा
Buldhana News: महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे (Shiv Pratistan President Sambhaji Bhide) यांच्याविरोधात राज्यभरतामध्ये जोरदार आंदोलन सुरु आहे. याप्रकरणी संभाजी भिडेंविरोधात राज्यभरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अशामध्ये संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी अशी देखील मागणी केली जात आहे. अशामध्ये राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुबोध सावजी (NCP Ex Minister Subodh Savaji) यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करत थेट राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.
'मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि राष्ट्रध्वजाबाबत बेताल वक्तव्य केल्याने आपण व्यथित झालो आहोत. त्यामुळे त्यांना आपण तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी. अन्यथा मी त्याचा खून करेल.', असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना दिला आहे. सुबोध सावजी हे आपल्या विविध शैलीतील आंदोलन आणि वक्तव्यामुळे प्रसिद्ध आहेत. त्यांनी आता संभाजी भिडेंबाबत दिलेला इशाऱ्यामुळे एकच खळबळ उडाली असून ते चर्चेत आले आहेत.
संभाजी भिडे यांनी अमरावतीमधील एका कार्यक्रमात महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी असे सांगितले होते की, 'मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते. त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ आणि शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले होते.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.