Osmanabad: कत्तलखाना चालवणाऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक, २ जण गंभीर जखमी  कैलास चौधरी
महाराष्ट्र

Osmanabad: कत्तलखाना चालवणाऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक, २ जण गंभीर जखमी

शहरातील अवैधपणे चालणाऱ्या कत्तलखान्यावर ती कारवाई करण्यास पोलिसांना चांगलीच भारी पडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उस्मानाबाद: शहरातील अवैधपणे चालणाऱ्या कत्तलखान्यावर (slaughterhouse) ती कारवाई करण्यास पोलिसांना (police) चांगलीच भारी पडला आहे. खिरणीमळा भागातील अनधिकृत कत्तलखान्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या (police) विशेष पथकावरच कत्तलखाना चालक- मालकासह कामगारांनी दगडफेक (Stone throwing) केली आहे. तसेच कत्तलखान्यातील चाकू, सत्तूरच्या साहाय्याने पोलिसांसह स्थानिक नागरिकांवर हल्ला (Attack) करण्यात आला आहे. ही थरारक घटना शनिवारी रात्री घडली आहे. यामध्ये २ पोलीस कर्मचाऱ्यांसह ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी आहेत.

हे देखील पहा-

गोवंशीय प्राण्यांची मांसासाठी बेकायदेशीररित्या कत्तल होत असल्याची गोरक्षक पवन कोमटी, सुमीत नवले, धन्यकुमार पटवा, सतीष सिरसीला यांनी दिली होती. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश पवार, पोहेकॉ काझी, घुगे, चव्हाण, आरब, कवडे, पोना सावंत, पोकॉ. कोळी, आरसेवाड, ठाकूर, मारलापल्ले यांच्यासह पोलीस मुख्यालयातील दंगा काबू पथकाने रात्री छापा टाकला होता. यावेळी तेथील पत्र्याच्या शेडमध्ये हुसेन पापा शेख, फैसल कैसर पठाण, सागर कबीर गायकवाड, आनंद जीवन पेठे तसेच अन्य २० लोक गुरांची कत्तल करताना पोलिसांना दिसले होते.

तसेच येथे अंदाजे ४ टन गोमस आढळून आले आहे. दरम्यान कत्तलखाना चालक- मालक खलिफा कुरेशी व कलीम कुरेशी यांच्यासह अन्य ५ ते ६ अनोळखी पुरुषांनी पोलीस पथकावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही उपरोक्त चौघांनी कत्तलखान्यातील चाकूने हल्ला केला होता. यामध्ये धन्यकुमार पटवा यांच्या उजव्या पायाला, दोन्ही हातांना आणि डोक्याला तर संतोष सिरसीला यांच्या डोक्यात जखम झाली आहे. सोबतच पोलीस पथकातील समाधान नवले यांच्या उजव्या डोळ्यास व बबन जाधवर यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे.

या प्रकरणी सपोनि- श्री. शैलेश पवार यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद सहा लोकांसह अन्य 5-6 अनोळखी पुरुषांविरुध्द भा.दं.सं. कलम- 353, 332, 333, 326, 325, 324, 143, 147, 148, 149 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम- 5(कत्र, 9 (अ) अंतर्गत उस्मानाबाद (श.) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT