जालन्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईचे आदेश
जालन्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईचे आदेश Saam Tv
महाराष्ट्र

जालन्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईचे आदेश

लक्ष्मण सोळुंके

जालना: अंबड पोलीस ठाण्याचे (Ambad Police Station) तत्कालीन वादग्रस्त पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांच्याविरुद्ध वाळू माफियांना अभय दिल्याबाबत कारवाई करण्याबाबतच्या याचिकेला अंबड न्यायालयाने अखेर हिरवा कंदील दिला आहे. तब्‍बल तीन वर्षानंतर पोलीस निरीक्षक शेळके व उपनिरीक्षक माने यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

अंबड पोलीस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक पांडुरंग माने यांनी दि.५ मार्च २०१८ रोजी वाळू तस्करीचा हायवा पकडून ताब्यात घेतला. दरम्यान तत्कालीन पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांनी मोबाईल वरून माने यांना हायवा सोडून देण्यास सांगितले. त्यानंतर हायवा सोडून देण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते देवानंद चित्राल व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही बाब उघडकीस आणली.

पोलीस प्रशासनाने निरीक्षक शेळके उपनिरीक्षक माने यांना पाठीशी घातल्यामुळे पोलीस निरीक्षक शेळके, उपनिरीक्षक माने यांच्यासह गुन्हेगारांना मदत केल्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने व अन्य चार कर्मचाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी या बाबद देवानंद चित्राल यांनी अंबड न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी तब्बल तीन वर्ष सुनावणी झाल्यानंतर आज चार ऑगस्ट रोजी न्यायालयाने या प्रकरणावर निकाल देतांना तत्कालीन पोलिस निरीक्षक शेळके उपनिरीक्षक माने यांच्याविरुद्ध १५६ (३) कलम अंतर्गत फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

याचं प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी सोनवणे व अन्य चार जणांना पुराव्या अभावी क्लीनचिट देण्यात आली आहे. मात्र या पाच ही जणा विरुद्ध कारवाई करण्यात यावी यासाठी आपण वरिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे याचिकाकर्त्यानी म्हंटल, या प्रकरणा मुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT