धक्कादायक! कोरोनाच्या भितीने वडिलांचा मृतदेह 3 दिवस ठेवला घरात

विरार मध्ये एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. कोरोनाच्या (Coronavirus) भीतीने 72 वर्षीय व्यक्तीचा 3 दिवस मृतदेह कुटुंबीयांनी घरातच ठेवला होता.
कोरोनाच्या भितीने वडिलांचा मृतदेह 3 दिवस  ठेवला घरात
कोरोनाच्या भितीने वडिलांचा मृतदेह 3 दिवस ठेवला घरातSaam Tv

विरार मध्ये एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. कोरोनाच्या (Coronavirus) भीतीने 72 वर्षीय व्यक्तीचा 3 दिवस मृतदेह कुटुंबीयांनी घरातच ठेवला होता. तर 40 वर्षीय मुलीनेही विरार नवबपूर समुद्रात जाऊन आत्महत्या केली होती तर आज सकाळी तिची दुसरी बहीण ही अर्नाळा समुद्रात जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे तिला वाचविण्यात यश आले आहे. वाचलेल्या तरुणीच्या जवाबावरून हा सर्व धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही सर्व घटना कोरोनाची भीती, आर्थिक विवंचना, आणि कौटुंबिक वादातून घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

विरार पश्चिम गोकुळ टाऊनशीप परिसरातील अग्रवाल ब्रूक्लीन पार्क या इमारतीत आई- वडील आणि दोन मुली असे 4 जणांचे कुटुंब राहत होते. मयत हरिदास साहकार (वय 72) , 65 वर्षांची आई, विद्या हरिदास सहकार (वय 40), स्वप्नल हरिदास साहकार (वय 36) असे कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींची नाव आहेत. वडील हरिदास हे रेशनिग डिपार्टमेंट मधून निवृत्त झाले होते.

कोरोनाच्या भितीने वडिलांचा मृतदेह 3 दिवस  ठेवला घरात
सलग दुस-या दिवशी 28 काेराेनाबाधितांचा मृत्यू; सर्वाधिक साता-यात

निवृत्तीच्या पेन्शन वर यांचे सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. 1 ऑगस्ट रोजी वडील हरिदास यांचे राहत्या घरात अचानक निधन झाले होते. या निधनानंतर वडिलांना कोरोना झाला असावा आणि हे जर आपण बाहेर कुणाला सांगितले तर आपणालाही विलगीकरणात ठेवतील या भीतीने 1 ऑगस्ट पासून 4 ऑगस्ट पर्यंत वडिलांचा मृतदेह राहत्या घरातील बेडवरच ठेवण्यात आला होता. मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून मृतदेहाच्या शेजारी, डाम्बर गोळी, कापूर, अगरबत्ती लावून सर्व कुटुंब हे घरातच मृतदेहा शेजारी बसून होते.

मंगळवारी याच कुटुंबातील 40 वर्षाच्या विध्या साहकार या तरुणीचा मृतदेह हा विरारच्या नवापूर समुद्र किनाऱ्यावर सापडला होता. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असता आज बुधवारी सकाळी दुसरी मुलगी स्वप्नल ही आत्महत्या करण्यासाठी अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर गेली असता स्थानिक नागरिकांनी व गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी तिला वाचविले आहे. वाचलेल्या मुलीच्या जवाबावरून सर्व घटना समोर आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com