Maharashtra Rain Alert  Saam TV
महाराष्ट्र

Rain Alert: राज्यात पुढील 2 दिवस अतिमुसळधार! कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात पुढील 2 दिवस अतिमुसळधार! कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Satish Kengar

Maharashtra Rain Alert: राज्यात उशिरा दाखल झालेला मान्सून आता महाराष्ट्रात सर्वत्र दाखल झाला आहे. गेल्या दोन दिवसात राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाल्याचे दिसून येत आहे. यातच आता हवामान खात्याने मान्सूनबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत.

राज्यात 27 जून म्हणजेच मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे 27 आणि 28 जून रोजी राज्यात ऑरेंज आणि यलो अलर्ट असेल, तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही महत्त्वाचे भाग आहेत. (Latest Marathi News)

दरम्यान, 29 आणि 30 जून रोजी महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असं सांगण्यात आलं आहे. मात्र यादिवशी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Maharashtra News Live Updates: ही तर गुजरात नवनिर्माण सेना; उद्धव ठाकरेंची टीका

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाका, मी काय ऐरागैरा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नेम

Assembly Election: पक्षाने अजित पवारांना तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं, आता युगेंद्र; सांगता सभेत शरद पवारांचे आवाहन

SCROLL FOR NEXT