Rain Update Maharashtra Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather: महाराष्ट्रासाठी पुढील २ दिवस अत्यंत महत्वाचे, कोकणसह घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट

Rain Update Maharashtra: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आता पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. पुढचे दोन दिवस राज्यासाठी महत्वाचे असणार आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Priya More

राज्यात यावर्षी वेळेआधी मान्सून दाखल झाला. मान्सूनने दमदार आगमन केलं. राज्यभरात मुसळधार पाऊस झाला खरा पण नंतर पावसाने विश्रांती घेतली. राज्यातील फक्त काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. पण विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा कोसळणार आहे. पुढचे दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी सांगितले की, कोकणात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाटमाथा भागात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण राज्यात २५ तारखेनंतर पाऊस कमी होणार आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस, मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात हलका-मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे.

इतर राज्यातही मान्सून दाखल झाला आहे. दोन दिवसानंतर राज्यात पडणारा मोठा पाऊस कमी होणार आहे. मान्सून अतिशय वेगाने यंदा ५ जुलैच्या सुमारास दाखल झाला. यावेळी मान्सून अनेक राज्यात लवकर दाखल झाला. पुढील चार-पाच दिवस पावसाचे आहेत. येणारे दोन दिवस पावसाची तीव्रता जास्त आहे. त्यानंतर पाऊस कमी होईल. उत्तर भारतातील काही राज्यात पाऊस सुरू झाला आहे. मान्सून १ जूनला केरळात आल्यानंतर ८ जुलैपर्यंत देश व्यापतो. मात्र यावेळेस ३० जूनपर्यंत मान्सूनने देश व्यापला.

प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवार आणि मंगळवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. फक्त मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहील. पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होणार आहे. सध्या पावसाचा जोर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा या भागात जास्त असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: विराट कोहलीकडे असलेल्या 'या' ७ महागड्या गोष्टी; किंमत ऐकून व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: नगर- मनमाड महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू

Panipuri Pani Recipe: पाणीपुरीचं आंबट-गोड पाणी बनवण्याची सीक्रेट रेसिपी; आजच करा ट्राय

Thursday Horoscope : तब्येतीची काळजी घ्या, दवाखाने मागे लागतील; 5 राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष खबरदारी

सकाळी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळा 'हा' एक घटक; लिव्हरची चरबी पटकन वितळेल

SCROLL FOR NEXT