OPERATION TIGER ROW: ARVIND SAWANT WRITES TO OM BIRLA, UBT SEEKS NO RECOGNITION FOR REBEL MPs Saam Tv
महाराष्ट्र

Political News : अरविंद सावंत संतापले, राजाभाऊ वाजे भावुक; पत्रकार परिषदेत कोण काय म्हणाले? पाहा सविस्तर

Maharashtra Political News : ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून फुटीर गटाला कोणतीही मान्यता किंवा विशेषाधिकार देऊ नयेत, अशी मागणी केली आहे.

Alisha Khedekar

  • अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवले.

  • पत्रकार परिषदेत भाऊसाहेब वाकचौरे भावुक झाले

  • अनिल देसाई यांनी खासदारांनी साथ सोडली नसल्याचा दावा केला.

गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यभरात ऑपरेशन टायगर जोरदार सुरु आहे. ठाकरेसेनेचे ६ खासदार खासदार फुटल्याची चर्चा सुरु असताना आज झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत, पक्षाचे लोकसभा गटनेते अरविंद सावंत,आणि राजाभाऊ वाजे यांनी याबाबत खंत व्यक्त केली. तसेच अरविंद सावंत यांनी ओम बिर्ला यांना अधिकृत पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी फुटीर गटाला स्वतंत्र मान्यता किंवा विशेषाधिकार देऊ नयेत, अशी मागणी केली आहे.

काय म्हणाले अरविंद सावंत ?

ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर आज संजय राऊत, गटनेते अरविंद सावंत, अनिल देसाई, खासदार राजाभाऊ वाजे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यासोबतच अरविंद सावंत यांनी ' ऑपरेशन टायगर' बाबत आपलं मत मांडलं. यावेळेस अरविंद सावंत यांनी फुटीर गटाबाबत बोलताना त्यांनी ओम बिर्ला यांना पत्र लिहिल्याचं म्हटलं. अरविंद सावंत यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा कायदेशीरदृष्ट्या एकच राजकीय पक्ष असून त्यामधून निर्माण झालेल्या कोणत्याही फुटीर गटाला स्वतंत्र अस्तित्व देण्याची तरतूद संविधानात किंवा संसदीय नियमांमध्ये नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही मागणीवर निर्णय घेण्यापूर्वी पक्षाची अधिकृत बाजू ऐकून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राजाभाऊ वाजे भावुक

भर पत्रकार परिषदेदरम्यान राजाभाऊ वाजे भावुक झालेले पाहायला मिळाले. तसेच यांनी अनिल देसाई त्यांनी म्हटलं की, आम्हाला आतापर्यंत कोणत्याही खासदाराने ते आमच्यासोबत नसल्याचं सांगितलेलं नाही. आम्ही सगळ्यांशी बोललो, त्यावेळेस त्यांनी आम्हाला आम्ही तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. तसेच गट फुटी प्रकरणाबाबत ओम बिर्ला यांना पत्र पाठवलं आहे. गट फुटू नये यासाठी आम्ही कायदेशीर प्रक्रियेतून जात असल्याचंही त्यांनी म्हटलं. या पार्श्वभूमीवर उद्या बैठकीचं आयोजन केल्याचं यावेळेस त्यांनी म्हटलं.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या चिन्हावर निवडून आलेल्या काही खासदारांबाबत माध्यमांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यासाठी हे पत्र पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटाने आपली भूमिका ठामपणे मांडत कोणत्याही फुटीर गटाला मान्यता देऊ नये, अशी स्पष्ट मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. दरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत अरविंद सावंत यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. दरम्यान आता राज्याच्या राजकारणात काय घडत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT