Shinde Sena ministers express dissent amid BJP's Operation Lotus fallout, triggering political storm in Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीत महाभूकंप, शिंदेसेनेविरोधात भाजपचं ऑपरेशन लोटस

ShindeSena Cabinet Boycott And Rising Political Tension: भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे महायुतीत भूकंप झालाय. राज्याच्या राजकारणातील हा भूकंप नेमका कोणत्या कारणावरुन झालाय? त्यावरुन कसं राजकारण तापलंय ? आणि शिंदेसेनेचे मंत्री का अस्वस्थ आहेत?

Bharat Mohalkar

शहाजीबापूंच्या मनातली ही खदखद ...हीच खदखद शिंदेसेनेच्या इतर मंत्र्यांनी व्यक्त केली ती थेट कॅबिनेटवर बहिष्कार टाकत...महायुतीतल्या या महाभूकंपाला कारण ठरलंय भाजपचं ऑपरेशन लोटस. भाजपनं मोठा घाव घातला तो थेट एकनाथ शिंदेंवरच....कारण श्रीकांत शिंदेंचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे प्रभावी नेते दिवंगत वामन म्हात्रेंचा मुलगा अनमोल आणि सून अश्विनी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत सकाळी भाजप प्रवेश केला.. हाच प्रवेश शिंदेसेनेला खटकला आणि त्यांनी दुपारच्या मंत्रिमंडळ बैठकीवरच बहिष्काराचं अस्त्र उगारलं...

कॅबिनेट झाल्यानंतर शिंदेसेनेचे मंत्री शह-काटशहाचा वाद घेऊन थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या दरबारात पोहोचले.... आणि या बैठकीतही जोरदार खडाजंगी झाली...शिंदेसेनेचे मंत्री- आमच्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना भाजपात प्रवेश दिला जातोय

शिंदेसेनेचे मंत्री-ज्यांच्याविरोधात निवडणूक लढवली त्यांनाही पक्षात घेतलं जातंय

शिंदेसेनेचे मंत्री-संभाजी नगर ,कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, कोकणात भाजपकडून युतीधर्माला तिलांजली

फडणवीस- पण तुम्ही उल्हासनगरमधून सुरुवात केली

फडणवीस- तुम्ही केलं तर चालतं आणि भाजपनं केलं तर चूक, हे चालणार नाही

फडणवीस- दोन्ही पक्षांना युतीचा धर्म पाळावा लागेल

दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र मंत्रिमंडळात कुठलीही नाराजी नसल्याचं म्हटलंय... खरंतर कल्याण डोंबिवलीतील पक्षप्रवेशामुळे शिंदेसेनेतील मंत्र्यांच्या असंतोषाचा कडेलोट झाला असला तरी याची सुरुवात झाली ती भाजपनं शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या विरोधकांना पक्षात आयात करायला सुरुवात केल्यानं.... मात्र कोणत्या पक्षप्रवेशामुळे शिंदेसेनेचे नेते अस्वस्थ आहेत?

शंभुराज देसाई विरुद्ध सत्यजीत पाटणकर (भाजप प्रवेश)

भरत गोगावले विरुद्ध स्नेहल जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश)

दादा भुसे विरुद्ध अद्वैय हिरे (भाजप प्रवेश)

किशोर पाटील विरुद्ध वैशाली सुर्यवंशी (भाजप प्रवेश)

महेंद्र दळवी विरुद्ध सुहास घारे (राष्ट्रवादी)

संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे (भाजप प्रवेश)

सुहास बाबर विरुद्ध वैभव पाटील (भाजप प्रवेश)

संजना जाधव विरुद्ध भरतसिंग राजपूत (भाजप प्रवेश) कन्नड

दुसरीकडे उदय सामंत यांनी आम्ही बहिष्कार टाकला नाही, असं सांगतानाच, मंत्र्यांनी त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या असतील, असं म्हणत एक प्रकारे नाराजीवर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केलाय...

ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील असंतोष उफाळून आलाय... त्यामुळे ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून होत असलेलं हे शह-काटशहाचं राजकारण आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तु मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो हे दाखवण्यासाठीची रणनीती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंनी फटकारल्यानंतर 'पिट्या भाई' दुसरीकडेच फिरले; रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश

Crime: पप्पा मला सोडा..., फावडा डोक्यात टाकत मुलाला संपवलं; सुनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याचं भयंकर कृत्य

कोल्हापुरात राजकारण फिरलं, हसन मुश्रीफ-समरजीत सिंह घाटगेंची युती; कट्टर विरोधक एकत्र कसे आले? VIDEO

Delhi Blast: मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अल-फलाहच्या संस्थापकाला अटक; दिल्ली बॉम्बस्फोटांनंतरची मोठी कारवाई

Ajit Pawar : अजित पवारांच्या घरासमोर अघोरी प्रकार; थेट उपमुख्यमंत्र्यांना वशीकरण करण्याचा प्रयत्न? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT