Eknath Shinde Ajit Pawar  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra politics : भाजपनं पश्चिम महाराष्ट्रात डाव टाकला, अजित पवारांनंतर शिंदेंना दिला धक्का, २ महत्त्वाचे नेते गळाला

NCP and Shiv Sena leaders join BJP ahead of elections : सोलापुरात भाजपनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. अजित पवार आणि शिंदे गटातील महत्त्वाचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार. स्थानिक निवडणुकीआधी भाजपचा मोठा डाव!

Namdeo Kumbhar

BJP Operation Lotus Solapur political defection : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. ठाकरे, काँग्रेस, शरद पवारांच्या अनेक नेत्यांनी भाजपची वाट धरली आहेच. आता सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही भाजपकडून जोरदार धक्का (Ajit Pawar and Eknath Shinde camps face political setback ) देण्यात आलाय. सोलापूरमध्ये भाजपकडून ऑपरेशन लोटस राबावले जात आहे. सोलापूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबतच सोलापूरमधील शिवसेनेचे दोन मोठे नेतेही कमळ हातात घेणार आहे. सोलापूरमध्ये भाजपकडून मोठा डाव टाकण्यात आला आहे. (Maharashtra politics latest news)

सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबतच शिवसेना शिंदे गटातील नेतेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मोहोळमधील शिवसेना शिंदे गटाचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश शिरसागर भाजपात प्रवेश करणार आहेत. मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले नागनाथ क्षीरसागर माजी आमदार राजन पाटलांसोबतच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

भाजपने मोहोळ तालुक्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाला राजकीय धक्का दिला आहे. मुंबई येथील प्रदेश भाजपच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्र पक्षांना हा मोठा धक्का मानला जातोय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने केलेली ही खेळी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

राज्यात काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहे. आयोगाकडून निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. सत्ताधारी भाजपकडूनही आकड्यांची जुळवाजुळव केली जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यभरातून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग वाढले आहे. विरोधकांसह सत्ताधारी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातील नेतेही भाजपच्या गोटात दाखल होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपची राज्यातील ताकद आणखी वाढल्याचे चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त ठरला

मालेगावमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; संतप्त महिलांचा आक्रोश|VIDEO

Matheran Travel : हिवाळ्यात माथेरानला फिरायला जाताय? मग 'या' ऐतिहासिक ठिकाणाला नक्की भेट द्या

Leopard Spotted In Ashti Taluka: बीड जिल्ह्यात बिबट्याचा मुक्त वावर; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

Mumbai Mantralaya News : मोठी बातमी! मंत्रालयात तरुणाचा गोंधळ, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT