केवळ दोन विद्यार्थी नापास; जिल्ह्याचा 100 टक्के निकाल हुकला Saam Tv
महाराष्ट्र

केवळ दोन विद्यार्थी नापास; जिल्ह्याचा 100 टक्के निकाल हुकला

अकोला जिल्ह्याचा यावर्षी दहावीचा निकाल 99.99 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे केवळ दोनच विद्यार्थी नापास झाले आहेत.

जयेश गावंडे

जयेश गावंडे

अकोला: अकोला Akola जिल्ह्याचा यावर्षी दहावीचा निकाल 99.99 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे केवळ दोनच विद्यार्थी नापास Fail झाले आहेत. अमरावती Amravati विभागात सर्वाधिक निकाल हा अकोला जिल्ह्याचा लागला असून निकालात जिल्ह्यातील मुलींनीच बाजी मारली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे यावर्षी दहावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे फक्त मूल्यांकनाच्या आधारावर यावर्षी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 13395 मुले, 12238 मुली अशी एकूण 25 हजार 633 नोंदणी केली होती.

हे देखील पहा-

या सर्व विद्यार्थ्यांचे गुण राज्य शिक्षण मंडळाकडे शाळांकडून Schools पाठविण्यात आले होते. त्यापैकी दहावी 25631 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये केवळ दोन विद्यार्थी नापास झाले आहेत. एक विद्यार्थी हा अकोला तालुक्यातील असून दुसरा विद्यार्थी हा बार्शीटाकळी तालुक्यातील असल्याचे समजते. हे दोन विद्यार्थी पास झाले असते तर जिल्ह्याचा निकाल हा 100 टक्के लागला असता, दरम्यान मुलांच्या निकालपेक्षा मुलींचा निकाल जास्त आहे.

जिल्ह्यातील पाच तालुक्याचा निकाल 100 टक्के

अकोल्यातील पाच तालुक्याचा निकाल हा 100 टक्के लागला असून यामध्ये मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, बाळापूर आणि पातूर या तालुक्याचा समावेश आहे. तर अकोला आणि बार्शीटकळी तालुक्यातील दोन विद्यार्थी नापास झाल्याने या तालुक्याचा निकाल 100 टक्के लागला नाही. जिल्ह्यातील तब्बल 476 शाळांचा निकाल हा पूर्णपणे 100 टक्के लागला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT