सिडको
सिडको  File Photo
महाराष्ट्र

कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचाऱ्यांकरिता सिडकोची विशेष गृहनिर्माण योजना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सिडको महामंडळाच्या कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचाऱ्यांकरिता असलेल्या विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2021 रोजी होणार असून या दिवशी योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत सिडकोकडून संपूर्ण महाराष्ट्रातील कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचाऱ्यांकरिता नवी मुंबईच्या 5 नोड्समध्ये 4,488 सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सन 2020 च्या प्रारंभी संपूर्ण जगावर कोरोना (कोविड-19) महासाथीचे संकट कोसळले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशभर टाळेबंदी लागू करण्यात आल्याने बहुतांशी दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. परंतु अशा बिकट परिस्थितीतीतही डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अन्य अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी हे कोविड योद्धे बनून, आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाप्रतिचे आपले कर्तव्य अव्याहतपणे पार पाडत राहिले. या कोविड योद्ध्यांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी संभाव्य प्राणहानी टळली तसेच अत्यावश्यक सेवांचा नागरिकांना अविरतपणे पुरवठा होत राहिला. या कोविड योद्ध्यांप्रति कृतज्ञतेची भावना म्हणून या योद्ध्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने ही विशेष गृहनिर्माण योजना आणली आहे.

हे देखील पहा -

सदर गृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या 5 नोड्समध्ये 4,488 सदनिका उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एकूण 4,488 सदनिकांपैकी 1,088 सदनिका या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) आणि उर्वरित 3,400 सदनिका सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आहेत. तसेच वैधानिक तरतुदींनुसार काही घरे ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दिव्यांग प्रवर्गांकरिता राखीव आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या 29 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार कोविड-19 महासाथीच्या काळात रुग्ण सर्वेक्षण, रुग्णांचा माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार आणि सहाय्यता उपक्रमांशी संबंधित शासनाच्या विविध विभागांतील कर्मचारी, कोविड संबंधी कर्तव्यावर असणारे आरोग्य कर्मचारी व अन्य कर्मचारी (जिल्हा प्रशासन, पोलीस, होम गार्ड, अंगणवाडी सेविका, वित्त आणि कोषागार, अन्न आणि नागरी पुरवठा, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे नेमून दिलेले विविध विभागांचे कर्मचारी इ.) तसेच कोविड संबंधी कर्तव्यावर असणारे कंत्राटी/बाह्यकंत्राटी/रोजंदारी/तदर्थ/मानधन तत्त्वावरील कर्मचारी यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याकरिता, या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याकडून देण्यात आलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS Andolan : पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर, मनसैनिकांचा प्रदुषण महामंडळास इशारा; मृत माशांचे केले उत्तरकार्य

Viral Accident Video: सुसाट वेगाने घात केला! इंस्टा लाईव्ह सुरू असतानाच भयंकर अपघात; २ ठार| थरारक VIDEO

Manoj Jarange Sabha: मोठी बातमी! मनोज जरांगेंची बीडमधील ९०० एकरावरील सभा रद्द; समोर आलं मोठं कारण

Mumbai Rain Alert: मुंबईकरांनो सावधान! मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज

Pachora Accident : रुग्णालयात जात असताना झाला घात; ट्रकची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT