Onion Farmers Relief Saam Digital
महाराष्ट्र

Onion Farmers Relief: कांदा उत्पादकांसाठी खूशखबर, कांद्याची भुकटी करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी, शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?

Sandeep Gawade

Onion Farmers Relief

निसर्गाचा लहरीपणा आणि दरातील चढउतार यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. हे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. याबाबत नाशिक जिल्ह्यातील माजी विधान परिषद सदस्य जयंतराव जाधव यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बैठकीत मागणी केली होती. त्याला मान्यता मिळालेली आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते तसेच कांदा निर्यातीबाबतच्या धोरणात फेरबदल केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. काही वेळा शेतकरी कांदा फेकून देतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपनीकडून डीहायड्रेशन प्रोजेक्ट केल्यास कांद्याची भुकटी करून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचा पथदर्शी प्रकल्प राबवून कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी जाधव यांनी शासनाकडे केली होती.

हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा असल्यामुळे या प्रकल्पाला स्मार्ट योजनेतून 60 टक्क्यांऐवजी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यासाठी जागतिक बँकेकडे स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. तसेच नाशिक जिल्ह्यात पिकणाऱ्या द्राक्षाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. मात्र फूड टेस्टिंग लॅबोरेटरी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना निर्यातीच्या अटींची पूर्तता करता येत नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात फूड टेस्टिंग लॅबोरेटरी उभा करण्यासाठी सुद्धा स्मार्ट योजनेतून अनुदान उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

यावेळी स्मार्ट प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर, कृषी संचालक सुभाष नागरे, सहसंचालक ज्ञानेश्वर बोटे, कृषी विभागाचे उपसचिव संतोष कराड, कृषी संचालक दशरथ तांबाडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT