अलिबाग मध्ये सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक आणि मुख्यलिपीकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले! राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

अलिबाग मध्ये सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक आणि मुख्यलिपीकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले!

जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे आणि मुख्यलिपीक सुहास दवटे यांना 40 हजाराची लाच स्वीकारताना अलिबाग लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : नोंदणी केलेल्या सोसायटीचा Society प्रलंबित निकाल देण्याकरिता मागितलेल्या लाच प्रकरणी अलिबाग येथील सहकारी संस्था कार्यालयाचे जिल्हा उपनिबंधक District Deputy Registrar आणि मुख्यलिपिक लाच Bribery लुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे Gopal Mavale आणि मुख्यलिपीक सुहास दवटे Suhas Davate यांना 40 हजाराची लाच स्वीकारताना अलिबाग लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे सहकारी संस्था कार्यलयात सुरू असलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. (Ongoing corruption in the co-operative society office exposed)

हे देखील पहा -

रोहा Roha अष्टमी Ashtami येथील माऊली इन्कलेव्ह गृहनिर्माण सोसायटीच्या Mauli Enclave Housing Society बिल्डरने सोसायटी करून दिली नसल्याने नोंदणीसाठी सभासदांनी अलिबाग येथील सहकारी संस्था कार्यालयात जिल्हा उपनिबंधक याच्यांकडे अर्ज केला होता. जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे यांच्याकडे हा अर्ज सोसायटी नोंदणीसाठी आला होता. सोसायटी नोंदणी प्रकरण हे मावळे यांनी मंजूर केले होते. मात्र तरीही निकाल प्रलंबित ठेवला होता. 23 सप्टेंबर रोजी प्रलंबित प्रकरणाची पडताळणी करण्याच्या दरम्यान मावळे आणि दवटे यांनी 40 हजाराची लाचेची मागणी करून 27 सप्टेंबर रोजी लाचेची रक्कम घेऊन येण्यास तक्रारदार सभासद याच्याकडे केली होती.

तक्रारदार यांनी मावळे आणि दवटे यांनी मागितलेल्या लाचे बाबत अलिबाग उपविभागीय अधिकारी लाच लुचपत कार्यलयाकडे तक्रार केली. तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीनुसार लाच लुचपत पथकाने अलिबाग येथील सहकारी संस्था कार्यालयात सापळा रचला. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून मुख्यलिपीक सुहास दवटे यानी 40 हजार रुपये स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. दवटेसह मावळे याना लाच लुचपत पथकाने अटक करून ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस निरीक्षक Police inspector रणजित गलांडे, पोह दीपक मोरे, पोह महेश पाटील, पोह कौस्तुभ मगर, पोह सूरज मगर, पोना विवेक खंडागळे यांनी हा यशस्वी कारवाई केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT