Satara Car Accident Saam Tv News
महाराष्ट्र

Satara Car Accident: विठुरायाची भेट अपूर्णच राहिली, कार अपघातात एका भाविकाचा मृत्यू; 6 गंभीर जखमी

Satara Police: कार अपघातामुळे या भाविकांचे विठुरायाच्या भेटीचे स्वप्न अपूर्णच राहिले आहेत.

Priya More

Satara News: आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadahi 2023) विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात (Car Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सह जण गंभीर जखमी झाले आहेत. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यात ही घटना घडली आहे. कार अपघातामुळे या भाविकांचे विठुरायाच्या भेटीचे स्वप्न अपूर्णच राहिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी येथे राहणारे काही गावकरी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले होते. बलोरो कारने हे सर्वजण पंढरपुरच्या दिशेने प्रवास करत होते. याच दरम्यान माण तालुक्यातील लोधवडेजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. अपघातानंतर कार उलटली. या अपघातामध्ये एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ उपचारासाठी साताऱ्यातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. या अपघातामध्ये कल्याण भोसले या भाविकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सातारा पोलिसांकडून अपघाताच तपास सुरु आहे.

दरम्यान, आज राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पायी वारी पूर्ण केल्यानंतर विठ्ठल भक्त पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. आषाढी एकादशीनिमित्त आज विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. अशामध्ये या अपघातामध्ये भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT