Wardha, selu, nagpur saam tv
महाराष्ट्र

Bor Dam : लग्नपत्रिका देऊन चाैघे निघाले हाेते घरी, गाईला वाचवताना झाला अपघात; नागपूरातील युवक ठार, तिघे जखमी

नागपूर येथील जयताळा परिसरातील रहिवासी हिंगणी येथे लग्न पत्रिका देण्यासाठी आले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- चेतन व्यास

Wardha News : गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे स्टेअरिंगवरुन नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन धडकली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात सेलू तालुक्याच्या बोरधरण येथे झाला. (Breaking Marathi News)

नागपूर येथील जयताळा परिसरातील रहिवासी अमित बंडू सायरे हा त्याच्या कारने प्रविण सुरेश सायरे, अभिषेक संजय कामडी व रोहण शेखर सातपुते यांच्यासोबत हिंगणी येथे लग्न पत्रिका देण्यासाठी आले होते.

लग्नपत्रिका दिल्यानंतर ते पहाटेच्या सुमारास बोरधरण व्हाया नागपूरला जाण्यासाठी निघाले. दरम्यान बोर टायगर रिसोर्ट जवळ त्यांच्या भरधाव कारसमोर अचानक गाय आडवी आली. गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचालकाचे स्टेअरिंगवरुन नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्यालगतच्या झाडावर धडकली.

ही धडक इतकी भीषण होती की कारच्या समोरील भाग चक्काचूर झाला. या अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिस अपघातस्थळी पोहचले. जखमींना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी कार चालक अमित सायरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या अपघात झाल्यानंतर बराचवेळ अपघातग्रस्तांना कुठलीही मदत मिळाली नाही. या अपघातात रोहन सातपुते (२५ रा. हिवलीनगर नागपूर) याचा मृत्यू झाला. तर अमित सायरे, प्रविण सायरे आणि अभिषेक कामडी हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT