accident, andhra pradesh, nagpur accident, car, truck. saam tv
महाराष्ट्र

वाराणसीतून आंध्रला निघालेल्या कारला अपघात; एक ठार, सात जखमी

हा अपघात इतका भीषण हाेता की त्यात चार चाकीचा पुढचा भागाचे माेठे नुकसान झाले.

मंगेश मोहिते

नागपूर : वर्धा मार्गावर (wardha) उभ्या ट्रकला एका चार चाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात (accident) एकाचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी (injured) झाले आहेत. या अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी पाेलीस रवाना झाले. या अपघातात अपघातात श्रीनिवासराव उन्डवल्ली यांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पाेलीसांनी (police) दिली. (nagpur accident news)

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-बुटीबोरी राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरगाव परिसरात घडली आहे. श्रीनिवासराव उन्डवल्ली हे नातेवाईकांसह वाराणसी (काशी) येथे चार चाकीतून देवदर्शनासाठी गेले होते. वाराणसी येथून नागपूर (Nagpur) मार्गे आंध्रप्रदेशकडे (Andhra Pradesh) परत जात असताना संबंधित वाहन चालकास रस्त्या लगत उभा असलेला नादुरुस्त ट्रक व्यवस्थित न दिसला नाही. त्यामुळे चार चाकी ट्रकवर जाऊन आदळली.

या अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व जखमी आंध्र प्रदेशातील रहिवासी आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महापालिकेसाठी आज मतदान, सर्व अपडेट एका क्लिकवर

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान हाणामारी

के एल राहुलची शतकी खेळी व्यर्थ; न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय

मध्य रेल्वेचा विशेष पॉवरब्लॉक; अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेनच्या मार्गात बदल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार? लाडकीच्या हाती, पालिकेची चावी?

SCROLL FOR NEXT