Crime News, Jalna saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime News : कुंभार पिंपळगावात गाेळीबार; पाेलिस तपास सुरु

या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

लक्ष्मण सोळुंके

Jalna Crime News : जालना जिल्ह्यात किराणा दुकानदारास एकाने पैशाची मागणी केली. दुकानदाराने पैसे न दिल्याने संबंधिताने दुकानदारावर गोळीबार केल्याची घटना घडल्याचे समाेर आले आहे. या गोळीबारात दुकानदार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Jalna Latest Marathi News)

जालन्यातील (jalna) कुंभार पिंपळगाव येथे ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी एका किराणा दुकानदारावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल आहे. (Breaking Marathi News)

आदेश चांडक असं गोळीबार झालेल्या दुकानदाराचं नाव असून या गोळीबारात ते जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात (hospital) उपचार सुरु आहेत. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी आदेश यांच्याकडे पैशाची मागणी केली हे पैसे देण्यास आदेश यांनी नकार देताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून चौकशीसाठी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT