one died 13 injured in accident at mumbai nagpur highway near vaijapur sambhajinagar  Saam Digital
महाराष्ट्र

Sambhajinagar Accident News : दोन वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू; 13 जखमी

one died 13 injured in accident at mumbai nagpur highway near vaijapur sambhajinagar: दुसरीकडे वैजापूर मध्ये एका प्रवासी वाहतुक करणा-या वाहनाचा आणि कारचा अपघात झाला.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तर 12 ते 13 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातांची माहिती कळताच पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर वैजापूर महामार्गावर पिकप आणि दुसऱ्या मालवाहतूक करणाऱ्या एका वाहनाचा अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती कळताच पोलिस आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.

दुसरीकडे वैजापूर मध्ये एका प्रवासी वाहतुक करणा-या वाहनाचा आणि कारचा अपघात झाला. या अपघातामध्ये 12 ते 13 जण जखमी झाले आहेत. मुंबई नागपूर महामार्गावरील वैजापूर शिवारातील लाडगाव चौफुलीवर हा अपघात झाला. या घटनेतील जखमींना पुढील उपचारासाठी वैजापूरच्या रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रक्षाबंधनासाठी घराकडे निघाला, मालगाडीनं उडवलं; एकुलत्या एक भावाच्या मृत्यूनंतर बहीण पोरकी

Baramati : बारामतीत प्रशिक्षण घेणाऱ्या विमानाचा अपघात, मोठी दुर्घटना टळली

Mahavatar Narsimha 'ओटीटी'वर कधी पाहता येणार?

Maharashtra Live News Update: अंबरनाथचं न्यायालयच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अंबरनाथमध्ये दाखल

Best Plane Seat: विमानातील सर्वोत्तम सीट कशी निवडावी? तिकीट बुकिंगपूर्वी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT