संभाजीनगर : किरकोळ वादातून टपरी चालकाची हत्या, दोघा भावांना अटक

police arrests brothers in fighting case at ranjangaon shenpunji near sambhajinagar: गेल्या काही दिवसांपासून परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढत चालले असल्याची तक्रार रांजणगाव शेणपुंजी नागरिकांची आहे.
police arrests brothers in fighting case at ranjangaon shenpunji near sambhajinagar
police arrests brothers in fighting case at ranjangaon shenpunji near sambhajinagar Saam Digital

- रामनाथ ढाकणे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे किरकोळ वादातून एका टपरी चालकाचा दाेघा भावांनी खून केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाेलिसांनी दोन्ही भावांना ताब्यात घेतले. दरम्यान रांजणगाव शेणपुंजी येथील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पाेलिसांना घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार सुनील राठोड या टपरीधारकाचे किरकाेळ कारणावरुन दाेघांशी वाद झाला. या वादाचे पर्यवसन मारामारीत झाले. त्यात दाेघांनी मिळून राठाेड याच्यावप चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केली.

police arrests brothers in fighting case at ranjangaon shenpunji near sambhajinagar
औकात नसणाऱ्यांना पक्षानं मोठं केलं, गद्दारांना साेडणार नाही; भाजपच्या माजी खासदारांनी सांगितलं पराभवाचे कारण (पाहा व्हिडिओ)

या प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी देखील गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या भागात पोलिस चौकी सुरू करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पाेलिस दलास केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

police arrests brothers in fighting case at ranjangaon shenpunji near sambhajinagar
Yavatmal : ढाणकीत भटक्या कुत्र्यांची दहशत,17 जणांचा घेतला चावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com