Leopard Body Parts Saam Tv
महाराष्ट्र

Leopard Body Parts: बिबट्याची नखे, दात, मिशा विकण्याचा डाव, आरोपीला नागपूर आणि भंडारा वन विभागाकडून अटक

आरोपीकडून बिबट्याच्या मिशा, नखे आणि दात जप्त करण्यात आलेले आहेत.

अभिजीत घोरमारे

भंडारा: नागपूर आणि भंडारा वन विभागाच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत बिबट्याचे अवयव विकणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून बिबट्याच्या मिशा, नखे आणि दात जप्त करण्यात आलेले आहेत (One arrest in case of trafficking Leopard body parts by Nagpur and Bhandara forest department).

सापळा रचून आरोपीला अटक

नागपूर (Nagpur) वन विभागाला मिळालेल्या माहिती नुसार पवनी तालुक्यातील सावरला येथे वन्य प्राणी बिबट (Leopard) याच्या अवयवांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. नागपूर वन विभागाच्या टीमने भंडारा वन विभागासह विशेष पथक तयार करुन सापळा रचला.

आरोपीला या गोष्टीची अंदाज लागल्याने त्याने तिथून पळ काढला. मात्र, वन विभागाच्या चमूने आरोपी रंगनाथ शंकर माथेरे (वय 35) राहणार तोरगाव, चंद्रपूर येथून मुद्देमालासह अटक (Arrest) केली आहे. आरोपीकडून बिबट्याच्या मिशा 21 नग, 13 नखे आणि बारा दात यामध्ये चार सुळे दात समाविष्ट आहेत.

आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमांतर्गत वन विभागाने गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षण भंडारा हे करीत आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT