आरक्षणाच्या मुद्यावरून गोटेंनी पत्रकातून साधला फडणवीसांवर निशाणा SaamTv
महाराष्ट्र

आरक्षणाच्या मुद्यावरून गोटेंनी पत्रकातून साधला फडणवीसांवर निशाणा

सरकार जाणार आम्ही सत्तेत येणार हि वटवट ऐकून आता महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक सुद्धा होत नाही. अशी टीका अनिल गोटे यांनी पत्रकातून करून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे

धुळे : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर कालचा संपूर्ण दिवस राज्यभरात भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये चक्का जाम आंदोलन केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पत्रकाद्वारे तोफ डागत आरक्षणाबाबत संघाची भूमिका स्पष्ट करावी, मगच आरक्षणाच्या प्रश्नावर बोलावे अशी टीका केली आहे.On the issue of reservation, Gote targeted Fadnavis in a letter

हे देखील पहा -

त्याच बरोबर देवेंद्र फडणवीस म्हणजे लबाड खोटी व अविश्वासार्ह व्यक्ती आहे. असं म्हणत मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षणाचा ठराव करतो असे म्हणणाऱ्यांचे सरकार गेले असाही उल्लेख या पत्रकामध्ये गोटे यांनी फडणवीसांवर निशाणा साधत केला आहे.

महाराष्ट्राच्या जनतेने बोंबलत फिरायला मोकळे केले तरीही मराठा समाजाला चार महिन्यांत आरक्षण देण्याची देवेंद्रांची घोषणा, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस,खाद्यतेल व महागाई यावर बोला असे म्हणत, सरकार जाणार आम्ही सत्तेत येणार हि वटवट ऐकून आता महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक सुद्धा होत नाही अशी टीका देखील गोटे यांनी पत्रकातून करून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RTI Informationच्या माध्यमातून पत्नी नवऱ्याचा पगार जाणून घेऊ शकते का? कोर्टानं काय दिला निर्णय

Tuesday Horoscope : आयुष्यात वादळ येणार; ५ राशींच्या लोकांच्या हातातून धनसंपत्ती निसटणार

Maharashtra Live News Update: मिरा-भाईंदर: पोलीस भरतीदरम्यान घेतलं 'ड्रग्ज'चे इंजेक्शन, बारामतीच्या उमेदवाराला अटक

Tuesday Horoscope: प्रेम, करिअर आणि पैसा कमवण्यासाठी नवीन संधी मिळेल, ताण कमी होईल; वाचा राशीभविष्य

Weight Loss Poha: वजन कमी कारायचं आहे आणि चटपटीत पण हवयं? मग सकाळी नाश्त्याला खा 'हे' हेल्दी पोहो

SCROLL FOR NEXT