अहमदनगर : सध्या कोरोनाच्या (Corona) नवीन व्हेरियंटने सर्वांची झोप उडवली आहे. आणखी २४ परप्रांतीय जिल्ह्यात (district) दाखल झाल्याची माहिती राज्यस्तरावरून आरोग्य विभागाला मिळाली आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १५६ आंतरराष्ट्रीय (International) स्थलांतरित झाले, असून त्यापैकी १३० जणांचा शोध लागला आहे. उर्वरित २६ जणांचा शोध सुरू आहे.
हे देखील पहा-
ओमिक्रानचा (Omicron) धोका टाळण्यासाठी राज्यस्तरावर ३ डिसेंबरपासून जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास (Travel) केलेल्यांची यादी जिल्हा आरोग्य विभागाकडे (Health department) पाठवली जात आहे. यादीनुसार, स्राव घेऊन प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १२१ जणांची तपासणी करण्यात आली आहे. ते सर्व कोरोना निगेटिव्ह आले आहेत. ९ प्रवाशांचे चाचणी अहवाल येणे बाकी आहे. (Omicron 86 international travelers Ahmednagar at high risk)
दुसरीकडे, आफ्रिकेत (Africa) स्थलांतरितांची संख्या किंवा अॅमिक्रानची संख्या ८६ आहे, आणि इतर देशात संख्या ७० आहे. त्यांना आरोग्य विभागाकडून कमी धोका आहे. कोपरगाव (Kopargaon) ३, राहाता २, राहुरी १, नगर मानपा १८, शेवगाव आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये प्रत्येकी एकाचा शोध सुरू आहे. अकोले ६, कोपरगाव १३, राहाता १५, राहुरी १०, संगमनेर १३, श्रीरामपूर १५, नगर शहर ६०, नगर ग्रामीण, शेवगाव प्रत्येकी २, कर्जत १, नेवासा ७, पाथर्डी ५, पारनेर ६, श्रीगोंदा (Shrigonda) आणि १५६ आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांचे आगमन झाले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.