संजय डाफ
नागपूर: झटपट पैसे कमविण्यासाठी देशभरात अनेक सायबर टोळ्या Cyber Cells सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्या दररोज अनेकांना गंडा घालत असतात. मात्र, आता या सायबर गुन्हेगारांनी वृद्धांनाच टार्गेट करणं सुरू केल आहे. अश्लील कॉल करून वृद्धांना ब्लॅकमेल Blackmail केलं जात आहे. अनेक वृद्ध नागरिक अशा कॉल्सला बळी देखील पडत आहेत.
वृद्धांच्या मोबाईल वर अश्लील व्हिडीओ पाठवणे;
गेल्या काही दिवसांपासून सेक्सस्टोर्शनचे Sextortion प्रमाण वाढत चालले आहेत. यासाठी सायबर गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. यात तरुणींचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. सोशल मोडिया Social Media किंवा थेट फोन करून या टोळ्या वृद्धांना टार्गेट करत आहेत. यात वृद्धांच्या मोबाईल वर अश्लील व्हिडीओ पाठवला जातो किंवा त्यांना फोन करून अश्लील संवाद साधला जातो. त्यानंतर लगेच फोन करून क्राईम ब्रँच Crime Branch किंवा सायबर सेल मधून बोलत असल्याचं सांगत खंडणी म्हणून मोठी रक्कम मागितली जाते.
नागपुरातील अनेक वृद्ध या प्रकाराला बळी पडत आहेत. काही वृद्ध असे प्रकार लगेच ओळखून घेतात. तर काही वृद्धांना धोका Scam लक्षात येत नाही. त्यामुळं त्यांची फसवणुक होते. मात्र, काही वृद्ध याविरोधात पुढं येऊन अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी पुढं सुद्धा येत आहेत.
सतर्क राहण्याची गरज;
दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारांचे धाडस वाढत चाललं आहे. अनेकदा प्रकार लक्षात येत नसल्यानं फसवणूक झालेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळं यावर सायबर सेलने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. तसंच नागरिकांनीही फसवणूक होणार नाही यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे. असेही पोलिसांनी सांगितले आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.