पोटापाण्यासाठी आला अन् अल्पावधीतच कोट्याधीश झाला!

अनेकदा आपण ऐकतो फेरीवाले, रस्त्यावर भीक मागणारे भिकारी यांच्याकडे कोट्यवधीची मालमत्ता आढळून येते. मुंबईत सुद्धा काहीसा असाच एक धक्कादायक प्रकार आढळून आला आहे.
पोटापाण्यासाठी आला अन् अल्पावधीतच कोट्याधीश झाला!
पोटापाण्यासाठी आला अन् अल्पावधीतच कोट्याधीश झाला! Saam Tv
Published On

मुंबई – अनेकदा अश्या घटना ऐकू येतात की, फेरीवाले, रस्त्यावर भीक मागणारे भिकारी यांच्याकडे कोट्यवधीची Billionaire मालमत्ता आढळून येते. मुंबईत Mumbai सुद्धा काहीसा असाच एक धक्कादायक प्रकार आढळून आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CST ते कल्याणपर्यंत फेरिवाल्याचे संघटीत गुन्हेगारीचे एक मोठे रॅकेट racket समोर आले आहे. यात एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संतोषकुमार सिंह उर्फ बबलू ठाकूर असे या आरोपीचे नाव आहे.

हे देखील पहा-

पोलिसांनी 43 वर्षीय संतोषकुमारसोबत त्याच्या पत्नीला आणि इतर 8 साथीदारांच्या मुसक्या चांगल्याच आवळल्या आहेत. ही कारवाई रेल्वे पोलिसांनी Railway Police केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोषकुमार याने मुंबई, नवी मुंबई आणि उत्तर प्रदेशातील त्याच्या मूळ गावी सूलतानपूरमध्ये अनेक कोट्यवधीच्या मालमत्ता जमवलेली आहे. एकट्या मुंबईतच त्याच्या 10 पेक्षा अधिक प्रॉपर्टीज आहेत. अनेक चाळींमध्ये त्याची घरे आहेत. संतोषकुमारने त्याच्या आणि पत्नीच्या नावावर दादर, परळ, तुर्भे, कल्याणसारख्या परिसरात जमिनी घेतल्या आहेत. बाजारभावानुसार पाहिलं तर या जमिनींची किंमत 10 कोटींपेक्षा अधिक आहे अशी माहिती आहे.

एका संकेतस्थळावरील रिपोर्टनुसार, संतोष कुमार आणि त्याच्या पत्नीने चाळींमध्ये घरे घेतली आहेत. ज्याठिकाणी येत्या काळात विकास होण्याची शक्यता अधिक आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी माहिती दिली की, चाळीच्या माध्यमातून पक्की घरं घेऊन त्यात गुंतवणूक करायची असे यांचे काम आहे. त्यातून हे नफा मिळवत होते.

पोटापाण्यासाठी आला अन् अल्पावधीतच कोट्याधीश झाला!
Viral Video: 'एका बॉयफ्रेंड'मुळे दोन तरुणींमध्ये भर रस्त्यावर हाणामारी

अल्पावधीतच झाला तो कोट्यधीश !

माहितीनुसार, 2005 मध्ये संतोष कुमार मुंबईत पोटापाण्यासाठी आला होता. सुरुवातीला दादर स्टेशनबाहेर तो शेव्हिंग ब्लेड्स विकायचा आणि त्यानंतर त्याची काही गुन्हेगारांसोबत ओळख झाली संपर्क वाढला. यानंतर त्याचा गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश झाला. गुन्हेगारांना दारुची ऑफर देऊन त्याने रॅकेट चालवन्यास सुरुवात केली. स्थानिक फेरिवाल्यांकडून ‘प्रोटेक्शन मनी’च्या नावाखाली तो त्यांना धमकावावत असे. दिवसाला 500 ते 5 हजारापर्यंत हा हफ्ता असायचा.

काही काळात तो लाखोमध्ये कमाई करू लागला. टोळीतील इतर सदस्यांनाही त्यातील मोठा वाटा तो द्यायचा. 2010 मध्ये नंतर संतोष कुमार आणि त्याची पत्नी गावी जाण्यासाठी ट्रेनने नाही तर चक्क विमानाने प्रवास करायचे. पोलिसांनी संतोष कुमारवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

पोटापाण्यासाठी आला अन् अल्पावधीतच कोट्याधीश झाला!
माकड छातीवर बसल्याच्या भितीनं 10 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू!

संतोष कुमारला ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु नाकाबंदी करून त्याला पोलिसांनी शेवटी ठाण्याजवळ गाठलेच. कुणाच्या इशाऱ्यावर संतोष कुमार हे काम करत होता ? दक्षिण मुंबईतून South Mumbai त्याचा मास्टरमाईंड रॅकेट चालवायचा असा संशय पोलिसांना आहे. संतोषचा म्होरक्या कोण यादिशेने पोलिसांचा तपास सध्या सुरु आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com