Old Monk High Court News  AI Image
महाराष्ट्र

Old Monk : ओल्ड मॉन्कची विक्री पुन्हा सुरु होणार? अखेर कंपनीने 'ती' अट मान्य केली

Old Monk News : ओल्ड मॉन्क रमच्या वादात नवं वळण! मुंबई हायकोर्टातील याचिका मागे घेत कंपनीने FSSAI कडे नव्या लेबलसाठी जाण्याचा निर्णय घेतला.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून ओल्ड मॉन्कच्या विक्रीवर परिणाम

  • रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील उत्पादनाच्या तपासणीनंतर FSSAI ने लेबलवर आक्षेप घेतला

  • कंपनीने ऑगस्ट महिन्यात दाखल केलेली याचिका घेतली मागे

भारतात लोकप्रिय असलेल्या ओल्ड मॉन्कच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून या ब्रँडची विक्री बंद आहे. आता या प्रकरणात आणखी एक नवं वळण आलं आहे. ओल्ड मॉन्क बनवणाऱ्या कंपनीने मुंबई हायकोर्टातून आपली याचिका मागे घेतली आहे. तसेच नव्या लेबलसह पुन्हा अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडे (FSSAI) जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात ओल्ड मॉन्कची विक्री पुन्हा कधी सुरू होणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

ओल्ड मॉन्क ही रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये बनवली जाते. येथे FSSAI च्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या उत्पादनाची तपासणी केली होती. त्यानंतर मे-जून महिन्यापासून महाराष्ट्रातील या ब्रँडच्या विक्रीवर परिणाम झाला. या कारवाईमागे बाटलीवरील लेबलचा मुद्दा आहे. FSSAI च्या मते, ओल्ड मॉन्क तयार करताना न्यूट्रल स्पिरिटमध्ये बाहेरून रमचा स्वाद मिसळला जातो. मात्र बाटलीवर त्याचा उल्लेख स्पष्टपणे केलेला नाही. त्यामुळे या उत्पादनाला थेट रम म्हणणे योग्य नाही असे म्हटले जात आहे.

FSSAI च्या मते, केवळ रमचा स्वाद मिसळल्याने एखादे मद्य रम ठरत नाही. त्यासाठी रमची आवश्यक वैशिष्ट्ये असणे गरजेचे आहे. तसेच बाटलीवरील '7 Years Old Blended' या उल्लेखावरही आक्षेप घेतला गेला. दुसरीकडे, कंपनीने आपले उत्पादन नियमांनुसार तयार केले जात असल्याचा दावा केला होता. याच मुद्द्यावर कंपनीने ऑगस्ट महिन्यात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मात्र आता कंपनीने न्यायालयातील याचिका मागे घेत नव्या लेबलसह FSSAI कडे जाण्याचे ठरवले आहे. आता या लेबलची तपासणी करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे ओल्ड मॉन्कची विक्री लगेच सुरू होणार नाही. FSSAI ची मंजुरी मिळाल्यानंतरच महाराष्ट्रातील विक्रीबाबत चित्र स्पष्ट होईल. दरम्यान आता सगळ्याच मद्यप्रेमींचे लक्ष ओल्ड मॉन्कच्या विक्रीकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात १० टक्के पाणीकपात

गोकुळमध्ये मोठा राजकीय भूकंप! कोरमच्या तिढ्यामुळे सत्तासंघर्ष टोकाला; हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याने खळबळ

High Blood Pressure: गावखेड्यांत हाय ब्लडप्रेशर वाढला! 3 पैकी 1 व्यक्ती त्रस्त, कारणे आणि आकडेवारी धक्कादायक

Maharashtra Politics: अजितदादांच्या पक्षात उलथापालथ होण्याची शक्यता, राज्यातील बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

DA Hike 2026 : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News! DA थेट १८% वर; जुलैपासूनची थकबाकीही मिळणार

SCROLL FOR NEXT