सुधागडमधील आमणोलीकडील पूल कोसळला.  saam tv
महाराष्ट्र

bridge collapse : मोठा अनर्थ टळला! डंपरच्या भारानं जुना पूल कोसळला, सुधागडमधील दुर्घटना

sudhagad bridge collapse due to heavy vehicle : सुधागड तालुक्यातील आमणोलीकडे जाणारा पूल आज, बुधवारी संध्याकाळी कोसळला. हा पूल आधीच जीर्ण आणि कमकुवत झाला होता. अवजड वाहतुकीमुळं हा पूल कोसळला.

Nandkumar Joshi

  • आमणोली येथील पूल कोसळला

  • सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

  • प्रशासकीय दुर्लक्षाबद्दल ग्रामस्थांमध्ये संताप

  • दोषींवर कारवाईची मागणी

अमित गवळे, पाली

पाली : सुधागड तालुक्यातील आमणोली गावाकडील पूल बुधवारी (ता. १३) संध्याकाळी कोसळला. क्षमतेपेक्षा जास्त खडी भरून जाणाऱ्या एका अवजड डंपरमुळे हा पूल कोसळल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. खडीनं भरलेला डंपर पुलाच्या ढिगाऱ्यात अडकला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमणोली गावाला जोडणारा हा पूल जीर्ण आणि कमकुवत झाला होता. बुधवारी सायंकाळी उशिरा खडीने भरलेला एक डंपर या पुलावरून जात असताना पुलाचा मधला भाग डंपरच्या भाराने कोसळला. डंपरचा मागील भाग तुटलेल्या पुलाच्या भागात अडकला, डंपरचेही नुकसान झाले आहे. घटनेच्या वेळी पुलावर इतर कोणतीही हलकी वाहने किंवा पादचारी नसल्याने मोठा अनर्थ टळला. हा पूल प्रामुख्याने हलक्या प्रवासी वाहनांसाठी असतानाही, परिसरातील उद्योजक आणि व्यावसायिक या पुलावरून मोठ्या प्रमाणावर अवजड मालाची अवैध वाहतूक करत होते. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, या तक्रारींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले.

पूल कोसळल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक अंकुश सांगळे, पोलिस हवालदार कल्पेश कांबळे, गणेश भोईर, मिलिंद कांबळे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा इतर संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तातडीने न पोहचल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर होता.

पुलाअभावी गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली असून, अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

अवजड मालवाहू वाहनांच्या सर्रास होणाऱ्या वाहतुकीमुळेच हा अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पुलाची क्षमता नसतानाही अशी अवजड वाहने सोडली कशी जातात? असा सवाल नागरिक करत आहेत. संबंधित डंपर मालक आणि याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यानंतर मुंबईत खळबळ; CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन; नागरिक भयभीत

PM मोदींच्या आवाहनाला मंत्र्यांचा ठेंगा; मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कधी कमी होणार?

हृदयद्रावक! मामाच्या गावी आलेल्या ३ शाळकरी मुलींचा धरणात बुडून मृत्यू; गावावर दुःखाचा डोंगर

Pune Bomb: मोठी बातमी! पुण्यात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली, ७ तासांचा टाईम सेट; VIDEO समोर

एका रात्रीत सोनं-चांदी महागलं; कस्टम ड्युटी वाढल्यानं खरेदीला चाप बसणार?

SCROLL FOR NEXT