Yavatmal Crime: जुना वाद पुन्हा उफळला; यवतमाळमध्ये गोळी झाडून निर्घृण हत्या SaamTV
महाराष्ट्र

Yavatmal Crime: जुना वाद पुन्हा उफळला; यवतमाळमध्ये गोळी झाडून निर्घृण हत्या

तालुक्यातील भांब राजा येथील माजी सरपंच आणि यवतमाळ बाजार समितीचे संचालक सुनील नारायण डिवरे यांच्या घरात घुसून ३ अज्ञात युवकांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याची घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ: तालुक्यातील भांब राजा (Bhambraja) येथील माजी सरपंच आणि यवतमाळ (Yavatmal) बाजार समितीचे (Market Committee) संचालक सुनील नारायण डिवरे यांच्या घरात घुसून ३ अज्ञात युवकांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या (Murder) केल्याची घटना गुरुवारी रात्री दरम्यान घडली आहे. सुनील डिवरे यांची हत्या जुन्या वादातून झाल्याची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे सुनील यांचे लहान भाऊ अनिल यांचा वाढदिवस गुरुवारी होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर सुनील हा रात्री घरात बसला असताना तीन युवकांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. त्यामुळे सुनील डिवरेवर कोणी जुन्या वादातून गोळी झाडली आहे, अशी चर्चा सुरु आहे. या घटनेची रात्री उशिरा यवतमाळ (Yavatmal) ग्रामीण (Rural) पोलीस (Police) स्टेशनमध्ये सुनील डिवरे यांच्या पत्नी आणि भांब राजा या गावाच्या सरपंच अनुप्रिया सुनील डिवरे यांनी तक्रार दिल्याची माहिती आहे.

हे देखील पहा-

घटनेची माहिती वाऱ्या सारखी यवतमाळ शहरात (city) पसरली. तेव्हा वसंतराव नाईक शासकीय जिल्हा रूग्णालयात (hospital) शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. भांब राजा आणि यवतमाळ शहरात कायदा आणि सुव्यस्था शांत ठेवणच्या दृष्कोणातून जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.दिलीप पाटील भुजबळ यांनी तगडा पोलीस (Police) बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या अजून देखील भांब राजामध्ये तनावाची परिस्थिती आहे. ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर अशी घटना घडल्याने विविध चर्चेला पेव फुटले आहे.

शिवसैनिक म्हणून बाजार समिती संचालक सुनील डिवरे यांनी परिसरात चांगली पकड मिळविली होती. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये या गणातील राजकीय समीकरण त्यांच्याशिवाय पूर्ण होणार नव्हते. या हत्याकांडामागे हेही एक कारण महत्वाचे मानले जात आहे. संभाव्य दावेदार म्हणून सुनील डिवरे यांचे नाव चर्चेत होते. निवडणूक लागण्यापूर्वीच जुन्या वादाचा धागा पकडून त्यांना कायमचे बाद करण्यात आल्याचा सूर ऐकायला मिळत आहे. दरम्यान पोलिसांच्या वाहनावर समर्थकांनी दगडफेक केल्यानंतर यवतमाळ मधून अतिरिक्त पोलीस कुमक भांब राजा येथे तैनात करण्यात आले आहे. सध्या गावात तणावाचे वातावरण आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT