Rashmi Bagal, Shri Adinath Sahkari Sakhar Karkhana, Pandharpur News saam tv
महाराष्ट्र

Rashmi Bagal गटास माेठा धक्का, 'आदिनाथ' वर प्रशासक

Shri Adinath Sahkari Sakhar Karkhana: आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाने बुधवारी पदभार घेतला.

भारत नागणे

Pandharpur News : करमाळा येथील शिवसेनेच्या नेत्या व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या रश्मी बागल (rashmi bagal) यांच्या करमाळा येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Shri Adinath Sahkari Sakhar Karkhana) प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. एकाच दिवसात आदेश काढल्यानंतर प्रशासकाने कारखान्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. यामुळे रश्मी बागल यांच्या गटास हा मोठा धक्का मानला जात आहे. (Maharashtra News)

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर देखील निवडणूक घेण्यास कसूर केल्याने कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. त्यानंतर प्रशासक म्हणून सोलापूर येथील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाचे विशेष लेखा परीक्षक बाळासाहेब बेंद्रे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बंद असलेला कारखाना सुरू करण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत (tanaji sawant) यांनी पुढाकार घेतला होता.

दरम्यान करमाळा (सोलापूर) तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक म्हणून बाळासाहेब बेंद्रे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी कारखाना स्थळावर जाऊन (बुधवार, ता. 26) पदभार घेतला आहे.

बेंद्रे यांनी यापूर्वी सोलापूर येथील विशेष लेखापरीक्षक (साखर) वर्ग १ येथे काम पाहिले होते असे समजत आहे. याशिवाय त्यांनी नगर व पुणे येथेही काम पाहिले आहे. प्रादेशिक सह संचालक राजेंद्रकुमार दराडे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. नियुक्ती होताच त्यांनी बुधवारी आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर येऊन पदभार घेतला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू

Maharashtra Live News Update: ST प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Badlapur Crime : गावगुंडाकडून पोळीभाजी केंद्राची तोडफोड; बदलापुरातील धक्कादायक प्रकार

Amruta Dhongade: किती सुंदर हास्य तुझे, गालावरची खळी ही लाजते

Cancer prevention tips: 3 पैकी १ कॅन्सर टाळता येतो! लाईफस्टाईलमध्ये ५ बदल वाचवू शकतात तुमचा जीव; तज्ज्ञांनी दिल्या टीप्स

SCROLL FOR NEXT