Koyna धरणातून पाणी साेडणार; कोयनाकाठच्या मुलांनी, युवकांनी नदीत पाेहायला जाऊ नये, प्रशासनाचे आवाहन

Water Released From Koyna Dam: महिला वर्गाने कपडे धुण्यासाठी नदीवर जाऊ नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाने गावक-यांना केले.
koyna dam
koyna damsaam tv

Satara News : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण (koyna dam news) पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट सुरू आहेत. काेयना धरण व्यवस्थापन समितीने दिलेल्या माहितीनूसार नदीपात्रामध्ये पाण्याचा २१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सिंचनासाठी आणि पिण्यासाठी मागणी वाढल्याने आज (गुरुवार) सकाळी ११ वाजता कोयना धरणातून पाणी साेडण्यात येणार आहे. (Maharashtra News)

koyna dam
Barsu Refienry साठीचा आजचा महत्वपूर्ण दिवस; राजन साळवींची सुरक्षा वाढवली (पाहा व्हिडीओ)

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण हे राज्यासह देशातील एक महत्वाचे धरण मानले जाते. या धरणातील पाणी साठ्यातून विद्युत पूरवठा निर्माण केला जाताे. सध्या शेतीला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी विविध गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाने काेयना धरणातून पाणी साेडले जावे अशी मागणी केली हाेती.

koyna dam
Shirdi News : १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक; वाचा ग्रामस्थांच्या मागण्या

सिंचनासाठी आणि पिण्यासाठी मागणी वाढल्यामुळे आज (गुरुवार) सकाळी ११ वाजता कोयना धरणाचे नदी विमोचक उघडून ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानूसार काेयना धरण व्यस्थापनाने नियाेजन केले आहे.

koyna dam
Mahadevrao Mahadik On Satej Patil : मी शेलारमामा, आलते शड्डू मारायला शिकवायला...फूकून उडवून टाकेन; महादेवराव महाडिकांचा सतेज पाटलांना टाेला

दरम्यान धरणातून पाणी साेडण्यात येणार असल्याने काेयना नदी काठच्या गावातील ग्रामस्थांनी, युवकांनी, मुलांना नदीत पाेहण्यासाठी जाऊ नये. तसेच महिला वर्गाने कपडे धुण्यासाठी नदीवर जाऊ नये असे आवाहन गावाच्या नजीकच्या स्थानिक प्रशासनाने गावक-यांना केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com