Sharad Pawar Saam TV
महाराष्ट्र

शरद पवारांबाबत आक्षेपार्ह ट्वीट; नाशिकचा तरुण पोलिसांच्या जाळ्यात

दोन दिवसांपूर्वी निखिल भामरे नावाच्या व्यक्तीने शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केले होते.

अभिजीत सोनावणे

नाशिक - शरद पवारांबाबत (Sharad Pawar) आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घटले आहे. दोन दिवसांपूर्वी निखिल भामरे नावाच्या व्यक्तीने शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केले होते. या तरुणाविरोधात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही निषेध करून चौकशी करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणी नाशिक ग्रामीणच्या दिंडोरी पोलिसांनी कारवाई करत निखिल भामरेला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. निखिल भामरेची पोलिसांकडून सुरू चौकशी आहे. तसेच निखिलच्या मोबाईलमध्ये आणखी काही आक्षेपार्ह मजकूर आढळल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

हे देखील पाहा -

निखिल भामरेचे ट्विट काय आहे

शेअर केलेल्या ट्वीटच्या स्क्रिनशॉमध्ये निखिल भामरेच्या 'वेळ आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची' असा मजकूर लिहिलेला आहे. याचा स्क्रिनशॉट जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत शेअर केला आहे.

ट्विट करत काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, काय पातळी वर हे सगळे होते आहे ... ह्या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Advice : शत्रूवर विश्वास ठेवणं एकवेळ चालेल, पण या ७ लोकांपासून आजपासूनच राहा दूर

Maharashtra News Live Update: जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 14वा दिवस; तोडगा न निघाल्याने बदनापूरमध्ये मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Diabetes Vegetable: भेंडी की कारले? डायबिटीजसाठी कोणती भाजी चांगली?

Pune MHADA Lottery: गुड न्यूज! पुण्यात म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी लॉटरी, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; शेवटची तारीख काय?

मोरपंखाची थीम; गणपती मखरसाठी सुंदर आणि आकर्षक सजावट

SCROLL FOR NEXT