अश्लिल वर्तनाला कंटाळून मित्रानेच संपवला मित्राचा जीव  Saam Tv
महाराष्ट्र

अश्लिल वर्तनाला कंटाळून संपवला मित्राचा जीव

साम टिव्ही ब्युरो

मंगेश मोहिते

नागपूर: सोबत राहणाऱ्या व्यक्तीने अश्लील वर्तन केल्याने युवकाने डोक्यावर लोखंडी राॅडने वार करून खून केल्याची घटना दाभा (Nagpur Dabha) येथे घडली. राजू नागेश्‍वर असे मृताचे नाव आहे. तर देवांश वाघाडे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बालाघाट येथे राहणारा राजू नागेश्‍वर हा काही महिन्यांआधी काम करण्यासाठी नागपुरात आला होता. आधी तो बांधकाम साईटवर काम करायचा.

एक महिन्याआधी तो दाभा ते गणेशनगर दरम्यान असलेल्या आशिष दुर्गे यांच्या गॅरेजमध्ये काम करीत होता. त्याच्यासोबत देवांश वाघाडे हा देखील काम करायचा. दोघेही गॅरेजमध्येच एका खोलीत रहायचे. राजू हा व्यसनाधिन होता. सोबतच त्याला मुलांसोबत अश्लील कृत्य करण्याचेही व्यसन होते. देवांश आणि तो एकाच खोलीत राहत असल्याने तो देवांशची नेहमीच छेड काढण्याचा प्रयत्न करायचा.

देवांशला त्याचे अश्लील वर्तन असह्य़ होत असल्याने तो वारंवार त्याला समजवायचा. मात्र, राजूला तरुण मुलांचे व्यसन असल्याने तो त्याला सतत छेडण्याचा प्रयत्न करायचा. रात्री काम झाल्यावर देवांश झोपला होता. तेव्हा राजूने पुन्हा त्याच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देवांशला चांगलाच संताप आला. त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. भांडणानंतर राजू तेथेच झोपला. पण, त्याच्या अश्लील कृत्यामुळे धास्तावलेल्या देवांशला मात्र, झोप आली नाही. त्याने रागाच्या भरता लोखंडी राॅडने राजूच्या डोक्यावर मारून त्याला एका फटक्यातच ठार केले. त्यानंतर त्याने राजूचा मृतदेह गॅरेज मागील मैदानात फेकून दिला.

खोलीत पडलेले रक्तही त्याने स्वच्छ केले आणि काही न झाल्याचे भासवून तो झोपला. रविवारी सकाळी गॅरेजचा मालक गॅरेजमध्ये आला असता त्याला राजू दिसला नाही. त्याने देवांशला राजूबद्दल विचारले असता, तो रात्री परत आलाच नसल्याचे त्याने सांगितले. आधीच व्यसनाधिन असलेल्या राजू बद्दल आशिषनेही फारशी चौकशी केली नाही. परिसरातील नागरिकांना मैदानात मृतदेह पडलेला दिसल्याने त्यांनी गिट्टीखदान पोलिसांनी याबाबत माहिती दिली. पोलिसांचा ताफा घटानस्थळी पोहोचला.

पोलिसांचा ताफा पाहून आशिषही तेथे गेला. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे गिट्टीखदान पोलिस आशिषच्या गॅरेजमध्ये असलेल्या खोलीत आले. तेथे त्यांना रक्त साफ केल्याचे डाग दिसले. ते पाहून पोलिसांनी देवांशची कसून चौकशी केली असता त्याने घडलेली हकीकत सांगून गुन्ह्य़ाची कबुली दिली.  क्षुल्लक कारणावरून आणखी एका खुनाची भर पडली, नागपुरात सतत वाढत असलेल्या गुन्हेगारी मुळे नागपूरकर मात्र चांगलेच धास्तावले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT