Manasvi Choudhary
मोसंबी हे आरोग्यासह त्वचेसाठी गुणकारी मानले जाते. चवीला गोड आणि रसाळ असणाऱ्या मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
मोसंबीच्या रसाचे नियमित सेवन केल्यास त्वचेचे सौंदर्य सुधारण्यास मदत होते.
नियमितपणे मोसंबीचा रस प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहते आणि त्वचा कोरडी होण्यापासून रोखली जाते. यामुळे त्वचा नैसर्गिकरीत्या मऊ आणि कोमल बनते.
व्हिटॅमिन सी समृद्ध मोसंबीचा रस त्वचेवरील काळे डाग, पिगमेंटेशन कमी करण्यास आणि चेहऱ्याला नैसर्गिक उजळपणा (Natural Glow) देण्यास मदत करतो.
मोसंबीच्या रसामध्ये वृद्धत्व विरोधीगुणधर्म असतात. हे त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते, ज्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाहीत.
हा रस प्यायल्याने शरीराचे रक्ताभिसरण उत्तम प्रकारे सुधारते, ज्याचा थेट सकारात्मक प्रभाव चेहऱ्याच्या कांतीवर पडतो.
सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये मोसंबी सोलून किंवा कापून टाका आणि त्यात थोडे पाणी मिक्स करा.
त्यानंतर त्यात गरजेनुसार पिठीसाखर मिक्स करून मिक्सरमध्ये मोसंबीचा रस तयार करून घ्या.
तयार झालेला रस एका भांड्यामध्ये किंवा गाळणीने नीट गाळून घ्या, जेणेकरून बिया आणि चोथा वेगळा होईल.
आता एका ग्लासामध्ये बर्फाचे तुकडे आणि चिमूटभर काळे मीठ टाका, आणि त्यात तयार मोसंबीचा रस ओतून थंडगार सर्व्ह करा.