Laxman Hake VS Manoj Jarange Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Laxman Hake VS Manoj Jarange : आम्ही काय बांगड्या भरल्यात का? जरांगेंना मुंबईत जाऊ देणार नाही, हाकेंचा थेट इशारा

Manoj Jarange Maratha Reservation Protest : मनोज जरांगे यांनी "चलो मुंबई" आंदोलनाची हाक दिली आहे. लक्ष्मण हाके यांनी आंदोलनाला विरोध दर्शवला आणि थेट इशारा दिला. मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण संघर्ष चिघळला आहे. मुंबई आंदोलनाआधीच दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

  • "आम्ही काय बांगड्या भरल्यात का? लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना थेट इशारा"

  • "मराठा आरक्षण आंदोलन : जरांगे मुंबईकडे रवाना, हाके संतप्त"

  • "चलो मुंबई आंदोलन थांबवणार! लक्ष्मण हाके वि. मनोज जरांगे संघर्ष उफाळला"

  • "जरांगेंच्या आंदोलनाला विरोध, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा रोखठोक इशारा"

  • "मराठा आरक्षणावरून वातावरण तापणार, हाकेंनी जरांगेंना दिला खडा इशारा"

Jarange protest latest update from Maharashtra : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईची हाक दिली आहे. २९ ऑगस्टपासून मुंबईमध्ये आंदोलनाला सुरूवात होणार आहे, त्याआधी २७ ऑगस्टपासून जरांगे जुन्नरमार्गे मुंबईकडे रवाना होणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांना मुंबईमध्ये पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका लक्ष्मण हाके यांनी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जरांगे आणि हाके आमनेसामने येणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या गणपतीचे मुंबईच्या अलीकडेच विसर्जन करणार असल्याचे हाके यांनी सांगितले. आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, मनोज जरांगे अशा पद्धतीची मागणी करत असतील तर आमचा जीव गेला तरी चालेल, पण ओबीसीमधून आरक्षण घेऊ देणार नाही, असेही हाके म्हणाले.

नेमकं लक्ष्मण हाके काय म्हणाले?

आम्ही ओबीसी विस्थापित असंघटित आहोत. आम्ही मनोज जरांगेंचा गणपती मुंबईत जाऊ देणार नाही. त्याला अलीकडेच विसर्जन करायला लावू. ओबीसींचे गावे आमचे आहे, ओबीसी वाड्या-वस्त्या आहेत. तो आमची आय काढत असेल, पुतळे जाळत असेल, आमच्याच माणसांना आमच्या अंगावर सोडत असेल, तर आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, आम्ही रस्त्यावर उतरू.
लक्ष्मण हाके

दादागिरीच्या जोरावर दहशत निर्माण करून आरक्षण मिळत नाही. दहशत निर्माण करणारी जात मागास असू शकत नाही. जरांगेंनी कितीही दहशत निर्माण केली तरी संविधानाने त्यांना आरक्षण भेटू शकत नाही. बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे यांनी ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही. तसे झाले तर देशभरातील ओबीसी संपलेला असेल, असेही हाके म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आय माय काढणारे जरांगे पाटील आणि सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे अजित पवार आणि एकनाथ शिंदे, या सगळ्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये चौका चौकात भले मोठे बॅनर उभे केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे.... जरांगे पाटील यांना रसद पूरवायची अन् पाठिंबा द्यायचा सुरू आहे. शरद पवार राष्ट्रवादी गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाची जरांगे पाटलांना सपोर्ट आहे. दोघांमध्ये मदत कशी करायची, त्यासाठी चढाओढ लागली आहे. उघड पाठिंबा देत आहेत. शरद पवार आणि अजित पवार हे वेगवेगळे नाहीत. मुख्यमंत्रींनी किती सांगत असले तरी शरद पवार हे सत्तेत एक प्रकारे सामील असल्याचा आरोप आहे. काहीही करा पण ओबीसींच आरक्षण संपवू नका, असे हाके म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT