OBC vs Maratha controversy: Laxman Hake’s statement sparks outrage, Maratha leaders furious. saam tv
महाराष्ट्र

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

Controversy Over Laxman Hake Statement : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या एका विधानावरून चांगलाच वाद पेटलाय. आता ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद हातापाईवर जाण्याची शक्यता आहे. त्याला कारण ठरलंय मराठा समाजाच्या नेत्यांनी हाकेंविरोधात केलेलं एक विधान. मराठा नेते नेमकं काय म्हणाले? हाकेंच्या कोणत्या विधानामुळे वाद पेटला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • लक्ष्मण हाके यांच्या विधानामुळे ओबीसी विरुद्ध मराठा वाद उफाळला.

  • हाके यांच्यावर हल्ल्याची योजना केल्याचा दावा.

  • मराठा नेते आक्रमक भूमिकेत.

ऐकलतं. तुम्हाला दांडक्यानं मारू, तुम्ही निजामाची औलाद आहात, अशा वादग्रस्त विधानानंतर लक्ष्मण हाकेंनी मराठा समाजातील मुलींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मराठा समाज आक्रमक झालाय.हाकेंना प्रत्युत्तर देण्यासाठी थेट 11 जणांची टीम तयार करण्याचा ठरावच मराठा समाजानं घेतलेल्या गोलमेज परिषदेत मजूर केलाय. यात त्यांनी वेळ आल्यास हाकेंना रस्त्यावर ठोकू, अशी जाहीर भूमिका घेतलीय.

दरम्यान मराठा विरुद्ध ओबीसी समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयीन लढाई सुरु असताना दोन्ही समाजातील नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या विधानांमुळे हा वाद आता हाणामारीवर येणार की काय? अशी चर्चा रंगलीय. त्यातच हाकेंनी ही मराठा समाजाला जोरदार प्रत्युत्तर दिलयं.

मुळात मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर आरक्षणात वाटेकरी नको, अशीच ओबीसी समाजाची आणि नेत्यांची भूमिका राहिलीय..मात्र ही भूमिका मांडतांना हाकेंची जरांगे आणि मराठा नेत्यांबाबत बोलताना अनेकदा जीभ घसरलीय. त्यामुळे वेळोवेळी वाद निर्माण झाले आहेत. मात्र आता मराठा नेत्यांनी थेट गोलमेज परिषदेतच हाकेंना ठोकण्याची भाषे केल्यानं ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT