Devendra Fadnavis On OBC Reservation Agitation: Saam TV
महाराष्ट्र

OBC Reservation: दोन समाजात तेढ होऊ नये, हा सरकारचा प्रयत्न: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे आंदोलन तापले असून दोन्ही समाजातील आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. याचदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारची भूमिका मांडली.

Bharat Jadhav

दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये, हाच आमचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. राज्यात ओबीसी आंदोलक आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय. आज ओबीसी समाजाचे आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळासोबत सरकारची बैठक होत आहे. हाके यांच्या आंदोलनाचा आज ९ वा दिवस आहे.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाचं आंदोलन तापले असून आज दोन्ही समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यात वाद जुंपल्याचं पाहायला मिळालं. आज लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा ९ वा दिवस आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी लक्ष्मण हाके हे आंदोलन करत आहेत.

तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यावर ठाम असून तेही आक्रमक झालेत. याचदरम्यान हाके यांच्या शिष्टमंडळासोबत सरकारची बैठक होत आहे. बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही समाजाला सबुरीचा सल्ला दिला. दोन्ही समाजात तेढ निर्माण होऊ नये हा सरकारचा प्रयत्न असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.

दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये, हाच आमचा प्रयत्न आहे. राज्यात ओबीसी आंदोलक आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारची बाजू मांडली. कोणत्याही परिस्थितीत दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये, दोन समाज एकमेकांसमोर येऊ नयेत. कोणत्याही समाजाला आपलं अहित होतंय, असं वाटू नये, सरकारला सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचं आहे. सगळ्यांचे प्रश्न कायद्याने सोडवायचे आहेत. सरकारचा हाच प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khare Shankarpali Recipe : यंदा दिवाळीला खास बनवा खुसखुशीत खारी शंकरपाळी, फक्त १० मिनिटांत रेसिपी तयार

Crime News : मामाच्या मुलीचा लग्नाला नकार, तरुण कमालीचा संतापला, चवताळलेल्या भावानं बाजारपेठेतच रक्तरंजित खेळ केला

WPL: आयपीएल ऑक्शनमध्ये मोठा बदल; खेळाडू रिटेनबाबत BCCIनं फ्रँचायझींना पाठवली गाइडलाइन

Bhindi Rassa Bhaji Recipe: तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला, तर घरीच बनवा भेंडीची रस्सा भाजी

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल

SCROLL FOR NEXT