Laxman Hake Saamtv
महाराष्ट्र

laxman hake : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्यानतंर लक्ष्मण हाकेंनी सोडलं उपोषण, VIDEO

laxman hake Latest News : मनोज जरांगे पाटील यांच्यानतंर आता लक्ष्मण हाकेंनी उपोषण सोडलं आहे. गेल्या ७ दिवसांपासून लक्ष्मण हाके उपोषणाला बसले होते.

Vishal Gangurde

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर धनगर आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनीही उपोषण सोडलं आहे. वडीगोद्री येथे ओबीसी महिला आणि मुलींच्या हाताने पाणी घेऊन हाकेंनी उपोषण सोडलं आहे. उपोषणाच्या ७ व्या दिवशी हाकेंनी उपोषण सोडलं.

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आरक्षण सुरु केलं. त्यानंतर काही दिवसांत वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे देखील उपोषणाला बसले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी हक्काच्या संरक्षणासाठी हाकेंनी जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषणाला सुरुवात केली होती. लक्ष्मण हाके यांनी उपोषणाला सुरुवात केल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. अनेक नेत्यांकडून त्यांनी उपोषण सोडावं, यासाठी प्रयत्न केले जात होते.

ओबीसींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषणाचा मार्ग निवडला होता. गेल्या ७ दिवसांपासून त्यांचं वडीगोद्री येथे उपोषण सुरु होतं. मात्र, आज बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सोडलं. यावेळी आंतरवाली सराटीतून शेकडो महिला लक्ष्मण हाके यांच्या भेटीला आल्या होत्या. उपोषण सोडल्यानंतर लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावली आहे. आता पुढील उपचारासाठी रुग्णालयाने जालन्याला रवाना करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School Holidays: शाळांच्या दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक जाहीर; शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी

Manoj Jarange Patil: 'मराठ्यांविरोधात जाणाऱ्यांना 2029ला पाडणार'; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा

'शिंदेंनी माझ्या नावे भाजपकडून 500 कोटी घेतले का?'दसरा मेळाव्यातून मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Who is Justice Shrihari Davare: उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांचा शिवसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या हाती घेतला धनुष्यबाण

Actress Death : आलियासोबत काम केलेल्या अभिनेत्रीचं अचानक निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

SCROLL FOR NEXT