nylon manja Saam Tv News
महाराष्ट्र

Nylon Manja: राज्यात नायलॉन मांजाची दहशत; जीवघेण्या मांजाने महिला पोलीस कॉन्स्टेबलचं नाक कापलं

Nylon manja cause injuries: छत्रपती संभाजीनगरमध्येही नायलॉन मांजामुळे पीएसआयचा गळा चिरला गेल्याची घटना ताजी असतानाच, नागपुरात महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या नाकावर गंभीर दुखापत झाली आहे.

Bhagyashree Kamble

नायलॉन मांजा अनेक भागात जीवघेणा ठरत आहे. मकर संक्रांतीला नाशिकमध्ये एकाचा मृत्यू तर, बऱ्याच ठिकाणी लोक जखमी झाले आहेत. एकीकडे नायलॉन मांजा विक्रेते आणि खरेदी करणाऱ्यांवर पोलील कारवाई करीत आहेत, तर दुसरीकडे नायलॉन मांजाच पोलिसांचा घात करीत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही नायलॉन मांजामुळे पीएसआयचा गळा चिरला गेल्याची घटना ताजी असतानाच, नागपुरात महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या नाकावर गंभीर दुखापत झाली आहे.

नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेले महिला पोलीस कॉन्स्टेबल नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाले आहेत. शीतल खेडकर असं जखमी महिला पोलीस कर्मचारी यांचं नाव असून, त्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ड्युटीवर जात असताना नायलॉन मांजामुळे त्या जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.

नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेले महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल खेडकर नायलॉन मांजामुळे जखमी झाल्या आहेत. आज दुचाकीवरून ड्युटीवर येत असताना, धारदार मांजामुळे त्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार असून, प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

ड्रोनद्वारे मांजा शोधण्याचे पोलिसांकडून प्रयत्न

छत्रपती संभाजीनगरात नायलॉन मांजामुळे पोलीस उपनिरीक्षक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. पोलीस उपनिरीक्षकाचा मांज्याने गळा कापल्यानंतर संभाजीनगर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांकडून संपूर्ण शहरात ड्रोनद्वारे पेट्रोलिंग सुरू आहे. ड्रोनद्वारे मांजा शोधण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू असून, मांजा वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Maharashtra Live News Update: भिमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य बहरलं

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

Ladki Bahin Yojana: लाडकींना सरकारकडून दणका, २६.३४ लाख महिला अपात्र; नेमकं कारण काय?

Nandurbar Accident : धुळे- सुरत महामार्गावर दोन भीषण अपघात; कोंडाईबारी घाटात वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT