Beed Crime News: व्हाट्सअॅप स्टेट्सला पतीसह इतर 1 पुरुष आणि 2 महिलांचे फोटो ठेऊन एका 33 वर्षीय नर्सने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या शिरूर कासार येथे घडली आहे. शिवकन्या गोरख देवडे वय 33, रा. पिंपळनेर ह. मु. शिरूर कासार असे आत्महत्या केलेल्या नर्सचे नाव आहे. (Latest Marathi News)
शिवकन्या ही 2010 पासून शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी नर्स म्हणून काम करत होती. तिने राहत्या घरीच एका पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर हा सर्व प्रकार घरची खिडकी उघडी असल्याने शेजारच्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी ही सर्व बाब पोलिसांनी सांगितली.
तर घटनेची माहिती कळताच शिरूर पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळी दाखल मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी आरोग्य केंद्रात पाठवला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आत्महत्येपूर्वी शिवकन्याने व्हाट्सअॅप (Whatsapp) स्टेट्सला पतीसह अन्य 3 जणांचे फोटो ठेवल्याची माहिती समोर आली आहे. (Beed News)
तर यादरम्यान शिवकन्या यांचे पती गोरख देवडे हे ट्रकचालक असल्याने बाहेर होते. तर 11 वर्षांचा मुलगा नातेवाइकांकडे गेला होता. त्यामुळे शिवकन्या घरी एकटीच असल्याचे सांगण्यात येत आहे. (Maharashtra News)
याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यन, शिवकन्याने व्हाट्सअॅप स्टेट्स ठेवलेले 1 पुरुष आणि त्या 2 महिला कोण? त्याचबरोबर शिवकन्याने आत्महत्या का केली? याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.