आता मी रिटायर झालोय,पुढचा नेता प्रणितीच - सुशीलकुमार शिंदे Saam Tv
महाराष्ट्र

आता मी रिटायर झालोय,पुढचा नेता प्रणितीच - सुशीलकुमार शिंदे

आमदार ते केंद्रीय गृहमंत्रिपदापर्यंत मजल मारणारे सुशीलकुमार शिंदे यांनी अनेकदा संघर्षकाळ अनुभवला.

विश्वभूषण लिमये

सोलापूर - आमदार ते केंद्रीय गृहमंत्रिपदापर्यंत मजल मारणारे सुशीलकुमार शिंदे यांनी अनेकदा संघर्षकाळ अनुभवला. संघर्षातूनच त्यांना यश मिळत असतानाच त्यांच्याभोवती पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा गराडाही वाढला. त्यांच्याच जोरावर महापालिकेत कॉंग्रेसला सत्ता मिळाली. मात्र 2014 च्या मोदी लाटेनंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. त्यानंतर आता मी निवडणूक लढविणार नसल्याचे सांगत रिटायर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांच्याभोवतीचा गराडा कमी झाला आणि त्याची प्रचिती काल झालेल्या कॉंग्रेस भवनातील बैठकीवेळी आली.

हे देखील पहा -

माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. म्हटल्यावर त्यांची रेल्वे स्थानकावर वाट पाहणारे पदाधिकारी, कार्यकर्ते आता तेवढ्या प्रमाणात पाहायला मिळत नाहीत. शहर- ग्रामीणमधील अनेकांना त्यांनी राजकारणात विविध पदांवर संधी दिली. तरीही, अनेकांनी त्यांची साथ सोडली. कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या राजकीय वाटचालीत शिंदे यांचे योगदान मोठे असल्याचे बोलले जाते.

तरीही, त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे सवेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत हाती 'घड्याळ' बांधले. एवढेच नाही, तर आमदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस धूमधडाक्‍यात साजरा होत असतानाच खरटमल यांनी कॉंग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांसह काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांना धक्‍का दिला. कॉंग्रेस भवन असो किंवा सुशीलकुमार शिंदे किंवा आमदार प्रणिती शिंदे यांच्या शहरातील कोणत्याही कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहणारे पदाधिकारीच या बैठकीत दिसले नाहीत. दरम्यान, आता मी रिटायर झालो असून पुढचा नेता आमदार प्रणिती शिंदे याच असतील, असेही शिंदे यांनी यावेळी आवर्जून स्पष्ट केले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

PM Modi Speech : सरकारी योजनांवरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, VIDEO

SCROLL FOR NEXT