ahilyanagar crime news saam tv
महाराष्ट्र

धाड धाड...! कुख्यात गुंडावर ७ गोळ्या झाडल्या, घटनास्थळी बघ्यांची गर्दी

ahilyanagar crime news : जामखेडमध्ये कुख्यात गुंडावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

जामखेडमधील न्युरानी कॉलनीत गोळीबार

दुचाकीने आलेल्या हल्लेखोराकडून सात राऊंड फायर

गोळीबारात कुख्यात सागर मोहळकर गंभीर जखमी

सुशील थोरात, साम टीव्ही

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. जामखेडमध्ये कुख्यात गुंडावर गोळीबार करण्यात आला. जामखेडच्या न्युरानी काँलनी येथे सात साडेसात वाजता झालेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती बघ्यांची एकच गर्दी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, जामखेडच्या न्युरानी कॉलनीमध्ये साडेसात वाजण्याच्या सुमारास कुख्यात गुंड सागर मोहळकर याच्यावर दुचाकीने आलेल्या एकाने सात राऊंड गोळीबार केला. या गोळीबारात त्याच्या अंगाला ४ गोळ्या लागल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीये. या हल्ल्यात मोहळकर गंभीर जखमी झाला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कुख्यात गुंड सागर मोहळकर हा काही दिवसांपूर्वी नाशिक मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आलेला होता. गुंड सागर मोहळकर याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसांपूर्वी सागरच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशन एनसी दाखल केली होती. नशेच्या आहारी गेलेल्या सागरची परिसरात त्याची मोठी दहशत आहे.

गोळीबारानंतर जामखेड पोलिसांनी तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे. त्यांच्या अंगाला चार गोळ्या लागल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.त्याच्यावर एकूण सात राऊंड फायर झाल्याची माहिती आहे.

कुख्यात गुंड सागर मोहळकर विरोधात 307 गुन्ह्याबद्दल कारवाई करण्यात आली होती. त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आलं होतं. याच प्रकरणात तो नुकताच जामीनवर बाहेर आला होता. त्याला दाखल केलेल्या दवाखान्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT