Aurangabad News Saam Tv
महाराष्ट्र

डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १२७ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी १२५ अधिकारी- कर्मचाऱ्यांना नोटीस

आर्थिक घोटाळ्यात दोषी आढळलेल्या अधिकारी आणि विविध प्राधिकरणाच्या सदस्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा (Marathwada) विद्यापीठात झालेल्या १२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश कुलपतीनी दिल्यानंतर आता विद्यापीठ प्रशासनाने १२५ अधिकारी- कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कोट्यवधी रुपयांच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी नसल्याबाबत २०१५ मध्ये हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

हे देखील पाहा -

यानंतर याप्रकरणी तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी यासंदर्भात चौकशी करून अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकरणाची सत्यता पडताळून अपेक्षित बाबींचा सखोल अहवाल समितीमार्फत शासनास सादर करण्यासाठी डॉ. आर. एस. धामणस्कर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीने शासनास प्राथमिक चौकशी अहवालही सादर केला होता.

चौकशी अहवालात शैक्षणिक विभागाकडील संलग्नीकरण, शुल्क वसुलीची नोंदवही अद्ययावत नसणे, विना निविदा करण्यात आलेली खरेदी, अतिरिक्त रक्कम विभागांना प्रदान करणे, विद्यापीठातील विविध विभागांनी खरेदीप्रक्रियेमध्ये किमाननिविदा दरपत्रके प्राप्त नसताना कोट्यवधीची खरेदी केली यांसह इतर अभिप्राय चौकशी समितीने दिले होते.

विद्यापीठात झालेल्या १२७ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी कुलपती कार्यालयाच्या आदेशाप्रमाणे आता कारवाई सुरू करण्यात येणार आहे. आर्थिक घोटाळ्यात दोषी आढळलेल्या अधिकारी आणि विविध प्राधिकरणाच्या सदस्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Crime: १५-२० जण एकावरच तुटून पडले, तरूणाची निर्घृण हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा सीसीटीव्ही, गरोदर पत्नीचा टाहो

Mahadevi Elephant : आणू महादेवीला घरी...! हत्तीणीला परत आणण्यासाठी दोन लाखांहून अधिक कोल्हापूरकरांनी दिली स्वाक्षरी

Maharashtra Live News Update : - यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी

Narali Purnima: नारळी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे? ९९% लोकांना माहिती नसेल

Ind vs Eng : नाइट वॉचमन म्हणून आला अन् इंग्लंडला धुतलं; फिफ्टी ठोकताच आकाश दीपची मैदानावरील Reaction Viral

SCROLL FOR NEXT