Supporters celebrate after decisive victories in North Maharashtra municipal council and nagar panchayat elections. 
महाराष्ट्र

Municipal Council Nagar Panchayat Election Result: उत्तर महाराष्ट्रात भाजपला जोरदार झटका; जाणून घ्या संपूर्ण नगरपालिका आणि नगरपरिषदांचा निकाल

North Maharashtra Civic Poll Results: उत्तर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसलाय. संगमनेर, नंदुरबार, यावल आणि सटाणा येथे भाजपचे मोठा पराभव झालाय.

Bharat Jadhav

  • उत्तर महाराष्ट्रातील ४९ नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले.

  • संगमनेरमध्ये सेवा समितीने ३० पैकी २७ जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केलं.

  • नंदुरबार जिल्ह्यात भाजपला एकही जागा न मिळाल्याने मोठा धक्का बसला.

महाराष्ट्रातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या २ डिसेंबर २०२५ रोजी निवडणुका पार पडल्या. उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर जिल्ह्यांमधील एकूण ४९ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचाही समावेश आहे. यात नंदुरबार, यावल, संगमनेर , सटाणा , मुक्ताईनगरमध्ये भाजपला मोठा झटका बसलाय.

उत्तर महाराष्ट्रात भाजपचा सर्वोत मोठा पराभव कुठे झाला असेल तर संगमनेर आणि नंदुरबारमध्ये झालाय. संगमनेर सेवा समीतीच्या नगराध्यक्ष उमेदवार मैथीली तांबे यांनी १६४०० मतांनी विजय मिळवलाय. येथे शिवसेना-भाजपची युती होती. या युतीच्या उमेदवार सुवर्णा खताळ पराभूत झाल्या आहेत. ३० पैकी २७ जागा जिंकून संगमनेर सेवा समिती आपला दबदबा निर्माण केला. येथे एक शिवसेना नगरसेवक विजयी तर दोन अपक्ष विजयी झालेत. तर नंदुरबारमध्ये भाजपला एकही जागा जिंकता आले नाहीये. जिल्ह्यात अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत.

अहिल्यानगर-

येथे विखे पाटलांनी आपली सत्ता कायम ठेवलीय. यावेळी विखे-पाटील पिता-पुत्र दोघे प्रचाराचा रिंगणात उतरले होते.

भाजप - १५

शिवसेना शिंदे गट - ३

राष्ट्रवादी अजित पवार गट - २

अपक्ष - ३ (विखे समर्थक)

1) राहता - भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.स्वाधीन गाडेकर विजयी

2) देवळाली प्रवरा - भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजीत कदम विजयी

3) नेवासा - शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. करण घुले विजयी

4) शिर्डी - भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री विष्णू थोरात विजयी झालेत.

5) कोपरगाव - भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान आघाडीवर

6) संगमनेर - संगमनेर सेवा समिती ( अपक्ष ) नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.मैथिली तांबे यांची विजयाकडे वाटचाल..

7) श्रीरामपूर - काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाणे यांची विजयाकडे वाटचाल...

8) राहुरी - शहर विकास आघाडीचे ( अपक्ष ) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबासाहेब मोरे विजयी...

9) श्रीगोंदा- भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता खेतमालीस विजयी...

एकूण २२ जागा

भाजप- १३

शिवसेना -९

10) पाथर्डी - भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय आव्हाड विजयी...

ऐकूण जागा - २०

भाजप -१४

राष्ट्रवादी SP-५

अपक्ष -१

11) जामखेड- भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रांजल चिंतामणी यांना निर्णायक आघाडी...

एकूण जागा २४

भाजप- १५

राष्ट्रवादी SP )- ५

राष्ट्रवादी-AP- १

शिवसेना-ES १

वंचित बहुजन-२

नंदुरबार जिल्ह्यातील चारही पालिकेचे निकाल

नंदुरबार जिल्ह्यातील चारही पालिकेचे निकाल जाहीर झालेत. यात अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला जोरदार झटका लागला .चारपैकी एकही नगरपालिका भाजपला जिंकता आलेली नाही.

शिवसेना शिंदे गट ०१

राष्ट्रवादी अजित पवार गट ०२

जनता विकास आघाडी ०१

नंदुरबार- रत्ना चंद्रकांत रघुवंशी शिवसेना शिंदे गट

शहादा - अभिजीत पाटील जनता विकास आघाडी

तळोदा- भाग्यश्री चौधरी राष्ट्रवादी अजित पवार गट

नवापूर- जयवंत जाधव राष्ट्रवादी अजित पवार गट

यावलमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून भाजपला धक्का

जळगाव जिल्ह्यातील यावल नगर परिषदेवर शिवसेना ठाकरे गटाने विजय मिळवलाय. येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार छाया पाटील विजयी झाल्या आहेत. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रोहिणी फेगडे यांचा पराभव झालाय.

येवला नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

येवला नगरपालिकेवर अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकलाय. राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र लोणारी ११६५ मतांनी विजयी झालेत. शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राजेंद्र लोणारी यांना १६३२६ मते मिळाली असून शिवसेना (शिंदे) रुपेश दराडे यांना १५१६१ मते मिळाली.

मनमाड नगर परिषदेत शिवसेनेचे योगेश पाटील यांची विजयाकडे वाटचाल

मनमाड नगर परिषदेत शिवसेनेचे योगेश पाटील यांची विजयाकडे वाटचाल सुरु झाली असून १० व्या फेरीत योगेश पाटील यांनी 212 २१२४ मतांची आघाडी घेतलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बसपाचा 'हत्ती' सुसाट; अवघ्या २१ वर्षांची तरुणी नगरसेवक बनली

India Vs Pakistan: दुबईत अंडर-19 आशिया कप फायनलमध्ये भारत-पाकिस्तान खेळाडूंमध्ये तुफान वाद, नेमकं काय घडलं? वाचा प्रकरण...

Konkan Tourism : रत्नागिरीत लपलाय सुंदर किनारा, अनुभवाल कोकणातील अस्सल सागरी सौंदर्य

Maharashtra Nagar Palika Election Result Live: अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेत महाराष्ट्र पोलिसांचा सुवर्ण विजय

Nagarpalika Nagar Parishad Election Result: नागपूर जिल्ह्यात भाजपला घवघवीत यश, वाचा संपूर्ण नगरपालिका आणि नगर परिषदांचा निकाल

SCROLL FOR NEXT