Leaders’ controversial warnings to voters spark debate during Maharashtra election campaigns. saam tv
महाराष्ट्र

Local Body Election: मत नाही तर निधी नाही; नेत्यांची गुंडगिरी, मतदारांना धमक्या?

Political Leaders Threatening Voters For Vote: निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी नेत्यांकडून मतदारांना कुठे धमक्या तर कुठे इशारा दिला जात आहे. तर काही मंत्री चक्क आपल्या पक्षाच्या उमेदवारांना खर्चाची चिंता करु नका, असा सल्ला देत आहेत. पाहूया याबाबत एक खास रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • तुम्ही काट मारली तर मी निधीवर काट मारणार

  • माघार न घेणाऱ्या उमेदवारांना लक्षात ठेवणार- समरजितसिंह घाटगे

  • जिथं काँग्रेस उमेदवार निवडून येईल, तिथं जनतेची काम होणार नाही- सुधीर मुनगंटीवार

ज्या वॉर्डात कमी मतं, त्यांची काही खैर नाही, हे वक्तव्य आहे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचं. हसन मुश्रीफांनी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना मतदारांना थेट धमकीच दिलीय. मात्र या धमक्यांचा सिलसिला सुरु झाला तो लातूरमध्ये अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यातून. तुम्ही काट मारली तर मी निधीवर काट मारणार, असं म्हणत अजित पवारांनी मतदारांना इशारा दिला.फक्त अजित पवारच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते समरजितसिंह घाटगेंनीही माघार न घेणाऱ्या उमेदवारांना लक्षात ठेवणार, असं वक्तव्य केलंय.

या धमक्यांच्या मालिकेत भाजपही मागे राहिलं नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी तर जिथं काँग्रेस उमेदवार निवडून येईल, तिथं जनतेची कामंच करणार नाही, अशी धमकी दिलीय. तर भाजप उमेदवाराने निवडणूक खर्चाची चिंता करु नये, असा सल्लाच मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. तर राजकीय नेते मतदार आपल्या घरी पाणी भरणारे सालकरी असल्याप्रमाणे धमक्या देत आहेत. त्यावरुन काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केलाय.तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सारवासारव केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT